IMPIMP

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

by nagesh
Adv.Pravin Chavan | Appointment of adv Praveen Chavan as 'Special Public Prosecutor' cancelled by home dept of maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गिरीश महाजनांवर ज्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Adv.Pravin Chavan) यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. न्यायालयात दाखल असलेल्या आणि प्रलंबित केसेससाठी महाराष्ट्र सरकारने अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Adv.Pravin Chavan) यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केले होती. मात्र आता महाराष्ट्र शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाच्या (Law and Judiciary Department) विभाग अधिकारी वैशाली बोरुडे (Vaishali Borude) यांनी अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ (Special Public Prosecutor) म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. राज्याच्या राज्यपालांच्या आदेशाने आज (बुधवार) हे आदेश काढण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही महिन्यांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Adv.Pravin Chavan) यांचे स्टिंग ऑपरेशनच्या (Sting Operation) माध्यमातून रेकॉर्ड केलेल व्हिडीओ विधानसभेत समोर आणले होते. प्रवीण चव्हाण यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना बनावट गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी विधिमंडळात केला होता. अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केल्याने त्यांच्याकडे असलेल्या 19 प्रकरणांचे काम पाहण्यासाठी नवीन सरकारी वकील नियुक्त केले जाऊ शकतात.

 

 

कोण आहेत प्रवीण चव्हाण?

 

प्रवीण पंडित चव्हाण (Praveen Pandit Chavan) हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत होते. सुरेशदादा जैन (Sureshdada Jain), रमेश कदम (Ramesh Kadam), डीएसके (DSK), महेश मोतेवार (Mahesh Motewar), बीएआर बँक (BAR Bank), रवींद्र बराटे (Ravindra Barate) यांच्या प्रकरणात ते विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. भाजप आमदार (BJP MLA) गिरीश महाजन प्रकरणातही त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे गिरीश महाजन प्रकरण?

 

जळगावची नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेपासून (Nutan Maratha Vidya Prasarak Sanstha Jalgaon) या वादाला सुरुवात झाली. साधारण चार वर्षापूर्वी या संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये स्पर्धा सुरु होती. पहिला गट नरेंद्र पाटील गट (Narendra Patil Group) आणि दुसरा भोईटे गट (Bhoite Group). ही संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला साथ दिली आणि बनावट पद्धतीने संस्था बळकावली असा पाटील गटाचा आरोप आहे.

 

नरेंद्र पाटील यांचे लहान भाऊ अ‍ॅड. विजय पाटील (Adv. Vijay Patil) यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
आपलं अपहरण आणि मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
तसेच चाकूचा धाक दाखवून संस्थेतून राजीनामा द्यायला सांगितलं असाही आरोप आहे.
या प्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि इतर 29 जणांवर जळगावमधील निंभोरा पोलीस ठाण्यात
(Nimbhora Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
हा गुन्हा 5 जानेवारी 2021 रोजी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) वर्ग करण्यात आला.

Government of Maharashtra cancels the appointment of Adv.Pravin P. Chavan as “Special Public Prosecutor”

 

 

Web Title :- Adv.Pravin Chavan | Appointment of adv Praveen Chavan as ‘Special Public Prosecutor’ cancelled by home dept of maharashtra

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar On Shivsena Dasara Melava | मंत्री अब्दूल सत्तार यांचा शिवसेनेला इशारा, म्हणाले – ‘घुसून सभा घेतली तर…’, दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद चिघळणार!

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…

Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt | शरद पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान, म्हणाले – ‘पत्राचाळ प्रकरणी लवकर चौकशी करा, आम्ही तयार’

 

Related Posts