IMPIMP

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

by nagesh
Chandrakant Khaire | 'Chief Minister Eknath Shinde is not even the dust of Shivaji Maharaj's legs' - Chandrakant Khaire

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन   शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र (MLA Disqualification) झाल्यास सरकार पडण्याच्या भीतीने देवेंद्र
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याच विधान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)
यांनी केले होते. परंतु काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या टीकेनंतर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आपले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त
केली आहे. कोणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, मी फक्त सावध करण्यसाठी असे बोललो होतो, असे खैरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले, काँग्रेसचे 22 आमदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फोडणार असल्याचा उल्लेख काल आमच्या भाषणात आला होता. मुळात ही बातमी खूप जुनी आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे म्हणून मी तसे बोललो होते. परंतु आमचे मित्र नाना पटोले (Nana Patole) यांची माझ्या विधानामुळे नाराजी झाली आहे. म्हणून त्यांची नाराजी दूर करतो. तसेच भाजप (BJP) फोडणार आणि काँग्रेसचे आमदार (Congress MLA) जाणार असे म्हणण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे माझे वक्तव्य मागे घेत आहे. तसेच कोणाचे मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही खैरे म्हणाले. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वाद होऊ नयेत यासाठी आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे खैरे म्हणाले.

 

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद (CM) मिळवून घेतील. कारण मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरु असतात, असे खैरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोलेंचे प्रत्युत्तर…

चंद्रकांत खैरे यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले म्हणाले, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी
दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही,
त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Web Title :-  Chandrakant Khaire | chandrakant khair retracted his statement regarding the split of congress mla maharashtra news

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | हाताला पट्टी अन् कातर झालेला आवाज, शरद पवारांनी ‘मंथन शिबिरा’ला लावली हजेरी (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

Priyanka Chopra | ‘मिस वर्ल्ड 2000’ची स्पर्धा होती ‘फिक्स’? प्रियांका चोप्राच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित

 

Related Posts