IMPIMP

Chandrakant Patil Birthday | चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस समाजाला समर्पित! यंदाचा वाढदिवस ‘आरोग्यम दिन’ म्हणून साजरा करणार

by nagesh
Chandrakant Patil Birthday | Chandrakantada Patil’s birthday dedicated to the community! This year’s birthday will be celebrated as ‘Arogyam Day’

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrakant Patil Birthday | भाजप (BJP) नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) यांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस 10 जून रोजी असून त्यांचा प्रत्येक वाढदिवस हा समाजाला समर्पित असतो. चंद्रकांतदादा पाटील यांचा यंदाचा वाढदिवस (Chandrakant Patil Birthday) ‘आरोग्यम दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी दादांच्या चाहत्यांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे.

सार्वजनिक जीवनात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत बच्चू पाटील यांचा 10 जून रोजी वाढदिवस आहे. सामाजिक कृतज्ञता-प्रकल्प-लोकसहभाग ही चंद्रकांतदादा पाटलांच्या वाढदिवसाची (Chandrakant Patil Birthday) खास वैशिष्ट्य आहेत. यंदाचा वाढदिवस गरीब, गरजू रुग्णांना संजीवनी देणारा असणार आहे. म्हणून त्यांना शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, जाहिरात न करता त्याची रक्कम उपक्रमासाठी जमा करुन आपले योगदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांचा यंदाचा वाढदिवस गरजू रुग्णांना संजीवनी देणारा ठरणार आहे. गरजू रुग्णांना शासकीय मदत असतेच, शिवाय चंद्रकांतदादा पाटील हे सातत्याने गजूंना मदत करत असता. मात्र, खर्च आणि उपचार यांचा मेळ लागत नसल्याने गणित कोलमडते, रुग्ण ही खचतो. दीर्घ उपचार, महाग उपचार, अपुरी आर्थिक व्यवस्था यातून रुग्णाला आशेचा किरण देण्यासाठी नागरिकांनी धनादेश देऊन चंद्रकांतदादा पाटील यांना कृतीतून शुभेच्छा द्याव्यात. ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी पुनर्निर्माण सोशल फाऊंडेशच्या (Punarnirman Social Foundation) नावाने चेक जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrakant Patil Birthday | Chandrakantada Patil's birthday dedicated to the community! This year's birthday will be celebrated as 'Arogyam Day'

10 जून रोजी चंद्रकांतदादा पाटील सकाळी 7 ते 9 या वेळत कोथरुड (Kothrud)
येथील जनसंपर्क कार्यालयात हजर राहून नागरिक, पदाधिकारी,
कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत.

तर सकाळी 9 ते 11 या वेळेत बालेवाडी (Balewadi) येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
तसेच संध्याकाळी 4 ते 8 यावेळेत कोथरुड येथील शुभारंभ लॉन्स (Shubhankar Lawns) येते उपस्थित राहून चंद्रकांतदादा पाटील शुभेच्छा स्वीकारणार करणार आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Chandrakant Patil Birthday | Chandrakantada Patil’s birthday dedicated to the community!
This year’s birthday will be celebrated as ‘Arogyam Day’

Related Posts