IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिवसेना कोणाची? कार्यवाहीला लागला वेग; केंद्रीय निवडणूक आयोगाला विधिमंडळाचे पत्र

by nagesh
Maharashtra Political Crisis | Maharashtra Vidhansabha Speaker Adv Rahul Narvekar MLA disqualification decision is likely to be taken before the monsoon session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Vidhansabha Speaker Adv Rahul Narvekar) यांनी नुकतेच एक मोठे विधान केले होते. “मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन,” असे नार्वेकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार, असे सूचक वक्तव्यही राहुल नार्वेकरांनी केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रता (Shivsena MLA Disqualified) प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाने (Maharashtra Legislature) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे. त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आले. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कार्यवाहीत गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तिवाद झाले होते. म्हणजे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Advocate Harish Salve) यांनीही हवे तर अध्यक्षांना दोन ते तीन महिन्यांत निर्णय घ्यायला सांगा, पण निर्णय तेच घेतील, असे म्हटले होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, ठाकरे आणि शिंदे यांना म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे,
त्याचबरोबर गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलटतपासणीही घेतली जाईल.
तसेच दोन्ही गटांना पुरावेही सादर करावे लागणार आहेत. खरी शिवसेना कोणाची?
याबाबत विधानसभा अध्यक्ष आधी निर्णय घेतील, अशीही चर्चा आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis)
निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयात आहे.
त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निर्णय काय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title : Maharashtra Political Crisis | Maharashtra Vidhansabha Speaker
Adv Rahul Narvekar MLA disqualification decision is likely to be taken before the monsoon session

Related Posts