IMPIMP

Chandrakant Patil | ‘ही जी हुकूमशाही सुरु आहे, जुलूम सुरु आहे त्याला भाजपचा विरोध’ ! ‘… तर नितीन गडकरी यांना देखील समजावून सांगेन, नाहीतर रस्त्यावर उतरु’

by nagesh
Chandrakant Patil | BJP leader nitin gadkari chandrakant patil rto fine rules pune bjp agitation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन वाहतुकीचे नियम (Traffic rules) तोडल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड न भरल्यास वाहतूक शाखेकडून (Traffic branch) नाकाबंदी आयोजित केली जाते आणि त्याद्वारे वाहनांची तपासणी करुन दंड वसूल (Fine recovered) केला जात आहे. या कारवाईला पुणेकर वैतागले आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता ते म्हणाले, ही जी हुकूमशाही सुरु आहे, जुलूम सुरु आहे त्याला भाजपचा विरोध आहे. याचा विरोध करण्यासाठी भाजप (BJP) नजीकच्या काळात रस्त्यावर उतरणार असल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर घरपोच तसेच मोबाईलवर याची माहिती दिली जाते. मागील तीन वर्षांपासून प्रामुख्याने सीसीटीव्हीद्वारे
ही कारवाई केली जात आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, हेल्मेट वापरणं हे जिवीताच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणता परंतु दुसरीकडे त्याच्यावर एवढे जास्त दंड लावता हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे. प्रबोधन करुन, समजावून किंवा ताकीद देऊनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. मात्र, जास्तीचा फाईन आकारणे हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) खात्याने हे दंड लावणे सुरु केले असल्यास त्यांना भेटून इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारणे अन्यायकारक आहे हे आम्ही त्यांना सांगू. आपल्या एखाद्या नेत्याने अपुऱ्या माहितीच्या आधारे, परिणाम काय होतील याचा विचार न करता एखदा निर्णय घेतला असेल तर भाजप त्या नेत्याला सुद्धा प्रेमाने निवेदन देऊन समजावेल. या विषयावर आम्ही नितीन गडकरी यांच्याशी देखील बोलू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader nitin gadkari chandrakant patil rto fine rules pune bjp agitation

 

हे देखील वाचा :

Health Tips | चाळिशीत प्रवेश करताय? पुरुषांनी ‘या’ 5 गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावं, अन्यथा…

Sachin Vaze | चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाला – ‘निलंबनाच्या काळातही मी…’

Rashmi Shukla Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या अर्जाला गृहमंत्रालयाचा विरोध; ‘या’ तारखेला पुढची सुनावणी

 

Related Posts