IMPIMP

Sachin Vaze | चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाला – ‘निलंबनाच्या काळातही मी…’

by nagesh
Sachin Vaze | even during period suspension i used carry out investigations said sachin vaze in front of chandiwal commission

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) न्या. चांदीवाल आयोगासमोर हजर झाला. त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) याने चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी निलंबित (Suspended) असल्याच्या काळात देखील मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाच्या नव्हे तर देशातील अन्य काही तपास (investigation) यंत्रणांच्या तपास कार्यात सहभागी होत असे, असा गौप्यस्फोट वाझे यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सोमवारी पुन्हा एकदा चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी त्यांचे वकील गिरीश कुलकर्णी (Lawyer Girish Kulkarni) यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना सचिन वाझे म्हणाला की, निलंबनाच्या काळात मी मुंबई पोलीस मुख्यालयाशी (Mumbai Police Headquarters) संलग्न होतो. पण जणू काही मी सेवेत आहे, अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या तपासात माझी मदत घेतली जात होती. घटनास्थळाचे पंचनामे करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे, साक्षीदार, संशयित यांचा तपास करणे ही कामे मी करीत असल्याचे वाझे याने सांगितले.

 

पत्रकार अर्णब गोस्वामी (Journalist Arnab Goswami) यांच्या अटकेच्या वेळी रायगड पोलिसांनी (Raigad police) माझी मदत घेतली होती.
तसे मी मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या निर्देशावरुन केले होते, असे सचिन वाझेने स्पष्ट केले.
वाझेची उलटतपासणी आज (मंगळवार) होणार आहे. आज सचिन वाझे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Sachin Vaze | even during period suspension i used carry out investigations said sachin vaze in front of chandiwal commission

 

हे देखील वाचा :

Rashmi Shukla Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या अर्जाला गृहमंत्रालयाचा विरोध; ‘या’ तारखेला पुढची सुनावणी

High Blood Pressure | मनुका उच्च रक्तदाब ‘कंट्रोल’ करण्यासाठी उपयोगी, ‘या’ पध्दतीनं करा आहारात समावेश, जाणून घ्या

Pune Crime | लग्न करतो, मुलालाही संभाळण्याचे आश्वासन देऊन 29 वर्षीय महिलेवर बलात्कार; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

 

Related Posts