IMPIMP

Chandrapur Warora Crime News | बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं; 25 वर्षीय तरुणीची हत्या?

by sachinsitapure

चंद्रपूर: Chandrapur Warora Crime News | चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन (Anandvan) उभे केले आहे. कुष्ठरोग्यांसाठी सुरु केलेल्या आनंदवन आश्रमात २५ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने आनंदवनात खळबळ उडाली आहे.

आरती चंद्रवंशी असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटस्फोटित तरुणी कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती. तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या चाळीस वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात.

२६ जून रोजी ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. काल रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घराच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वरोरा पोलिसांनी (Warora Police Station) अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.बाबा आमटेंनी उभा केलेल्या या आनंदवन आश्रमात आजपर्यंत हजारो कुष्ठरोगी आणि वृद्धांना आसरा मिळाला आहे. सामाजिक काम करणाऱ्या आश्रमात तरुणीचा खून होणे ही धक्कादायक बाब असून पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरु आहे.

Related Posts