IMPIMP

CNG Price Hike In Pune | पुणे शहरात मध्यरात्रीपासून CNG पुन्हा 6 रुपयांनी महागणार

by nagesh
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन CNG Price Hike In Pune | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) 1 एप्रिलपासून मुल्यवर्धित कर अर्थात VAT कमी केल्याने सीएनजीच्या दरात घट झाली होती. जवळपास 6 रुपये 30 पैशांनी सीएनजीचे प्रति किलोचे दर कमी केले होते. दर कमी झाल्याने वाहनचालकांना एक मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, आता पुन्हा सीएनजीचे दर (CNG Price Hike In Pune) वाढणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला (Ali Daruwala) यांनी सांगितले की, ”सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयात करण्यात येणाऱ्या वायूच्या वाढीमुळे दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे. त्यामुळे ही एकदम मोठी दरवाढ करण्यात येत असल्याचे,” ते म्हणाले. दरम्यान याचा परिणाम पुणे शहरात (Pune) बुधवार (6 एप्रिल) रोजी मध्यरात्रीपासून सीएनजीचे प्रति किलो 6 रुपयांनी पुन्हा वाढ होणार आहे. मध्यरात्रीपासून शहरात 62.20 रुपये प्रति किलोवरून 68 रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. (CNG Price Hike In Pune)

 

 

दरम्यान, मुल्यवर्धीत कराचा (VAT) दर 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने
महाराष्ट्रात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस आणि वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले होते.
पुणे आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो सहा रुपये 30 पैशांनी स्वस्त झाला होता.
पण, या निर्णयाचा लाभ आता ग्राहकांसाठी तोट्याचा ठरला आहे.
दरम्यान, ”आंतरराष्ट्रीय बाजारात या विशिष्ट वायूची किंमत जोपर्यंत कमी होत नाही.
तोपर्यंत दर असेच राहणार असल्याचे,” अली दारुवाला यांनी सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CNG Price Hike In Pune | cng gas will go up by 6 again from 6 april petrol diesel prices

 

हे देखील वाचा :

Varun Sardesai – ED Action On Sanjay Raut | ‘संजय राऊत आमची बुलंद तोफ, त्यांच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील’; वरुण सरदेसाई यांचा इशारा

Heart Attack Signs | हार्ट अटॅकपूर्वी दिसतात ‘हे’ 6 संकेत, कधीही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Hormonal Imbalance | जर अचानक वजन कमी होत असेल तर हार्मोनल बदल होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे आणि ते कसे टाळावे

 

Related Posts