IMPIMP

Varun Sardesai – ED Action On Sanjay Raut | ‘संजय राऊत आमची बुलंद तोफ, त्यांच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील’; वरुण सरदेसाई यांचा इशारा

by nagesh
Varun Sardesai- ED Action On Sanjay Raut | shiv sena leader sanjay raut gave a call then shiv sainik will take to the streets said varun sardesai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Varun Sardesai – ED Action On Sanjay Raut | मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी (Mumbai Patra Chaal Scam Case) सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते (Shivsena Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची 11.15 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर युवा सेनेचे नेते (Yuva Sena Leader) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वरुण सरदेसाई नागपुरमध्ये (Nagpur) बोलत होते. (Varun Sardesai – ED Action On Sanjay Raut)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वरुण सरदेसाई म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्रित करण्यात संजय राऊत यांचे मोठे योगदान आहे.
ते शिवसेनेचे प्रमुख वक्ते असून बुलंद तोफ आहे.
त्यांनी एक हाक जरी दिली, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
तसेच भाजपचे 105 आमदार (BJP MLA) संजय राऊत यांच्या मुळे घरी बसलेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री (CM) झाल्याच्या रागातून राऊतांवर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप अरुण सरदेसाई यांनी केला आहे.

 

युवा सेनेचा निश्चय दौरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. त्याचाच दुसरा भाग म्हणून विदर्भात (Vidarbha) मेळावे आहेत.
युवा सेनेचे काम चांगले आहे. युवा सेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी दिली.
तसेच शिवसेना कुणाची टीम आहे, असं मला वाटत नाही.
शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना किंग मेकर नाही तर किंगच्या भूमिकेत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

 

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे.
प्रविण राऊत (Pravin Raut) यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut)
तसेच स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच (Kihim Beach Alibaug)
येथील 8 प्लॉटसह दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली आहे.

 

Web Title :- Varun Sardesai- ED Action On Sanjay Raut | shiv sena leader sanjay raut gave a call then shiv sainik will take to the streets said varun sardesai

 

हे देखील वाचा :

Heart Attack Signs | हार्ट अटॅकपूर्वी दिसतात ‘हे’ 6 संकेत, कधीही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Hormonal Imbalance | जर अचानक वजन कमी होत असेल तर हार्मोनल बदल होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे आणि ते कसे टाळावे

PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवारांनी का घेतली PM मोदींची भेट ? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

 

Related Posts