IMPIMP

Dattatray Bharne | शिवीगाळ प्रकरणावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण, मी मराठीत बोललो, शिवीगाळ केली नाही, तक्रारीला कायदेशीर…

by sachinsitapure

इंदापूर : Dattatray Bharne | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणूक आज मतदानाच्या दिवशी देखील गाजत आहे. काल मतदानाच्या पूर्वसंध्येला इंदापूरमध्ये (Indapur) अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुप्रिया सुळेंचे (Supriya Sule) कार्यकर्ते नाना गवळी (Nana Gavli) यांना शिवीगाळ केली. या संबंधीचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडीओत आमदार भरणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. आता यावर खुद्द दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, मी मराठी भाषेत बोललो, पण मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यामुळे मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचे भांडण दिसले. मी तिथे गेलो, त्यावेळी बारामती अ‍ॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता.

त्याने माझ्या विरोधातही शब्द वापरले. मीसुद्धा माणूस आहे, मी त्याला विचारले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले असेलच, गावकरी त्याच्यावर धावून आले. जर मी तिथे नसतो तर अनर्थ घडला असता. पैशाचे वाटप तो करत होता. माझ्या मराठी भाषेत मी बोललो. कोणताही राजकीय हेतू नव्हता, असा खुलासा भरणे यांनी केला.

दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, मी दबाव टाकतोय असे वाटत असेल तर व्हिडीओमध्ये जे लोक दिसत आहेत त्यांचे जबाब नोंदवा. त्यांना विचारा, तिथे पैशाचे वाटप कोण करत होते, नोकऱ्यांचे आमिष कोण दाखवत होते. निवडणूक आयोगातही मी हेच सांगीन. तक्रारीला कायदेशीर पद्धत्तीने उत्तर देईन.

भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यात चांगल्या पद्धत्तीने मतदान घड्याळाला होणार आहे. सहानंतर लोकांच्या विकासकामे, दुखले खुपले हे आम्हीच बघू. तो बारामती एग्रोचा कर्मचारी आहे. तो कार्यकर्ता नाही. काम करणारा माणूसच चिडतो. असे काही झाले असेल तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो, असे भरणे म्हणाले.

Related Posts