IMPIMP

Sindhudurga Boat Accident | उजनी पाठोपाठ सिंधुदुर्गात बोट दुर्घटना! बर्फ घेऊन जाणारी बोट उलटल्याने दोघांचा बुडून मृत्यू, 2 जण बेपत्ता

by sachinsitapure

सिंधुदुर्ग : Sindhudurga Boat Accident | उजनी धरण जलाशयात बोट उलटल्याने ६ जण बुडून मरण पावल्याची घटना ताजी (Ujani Dam Back Water Accident) असतानाच आता सिंधुदुर्गात सुद्धा बोट बुडाल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात बर्फ घेऊ जाणारी एक बोट उलटली आहे. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याची कार्य सुरू आहे.

वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन निघालेली एक बोट उलटली. या बोटीत ७ खलाशी होते. बोट उलटल्यानंतर ३ जणांनी पोहत किनारा गाठला. तर ४ जण बेपत्ता होते, त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले तर २ जण अजूनही बेपत्ता आहे.

जोरदार वादळी वारे सुटल्याने ही बोट उलटली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता खलाशांपैकी एकजण रत्नागिरीचा तर १ जण मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू आहे.

MLA PN Patil Kolhapur | कोल्हापूरमधील काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Related Posts