IMPIMP

Desai Trophy | एच व्ही देसाई महाविद्यालयाने पटकावली देसाई करंडकची ‘चॅम्पियन ट्रॉफी’

by nagesh
Desai Trophy | HV Desai College wins Desai Cup 'Champion Trophy'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Desai Trophy | एच व्हीं देसाई महाविद्यालयात 31 मार्च व 1 एप्रिल रोजी 2 दिवसीय ‘देसाई करंडक’ (Desai Trophy) या अंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एच व्ही देसाई महाविद्यालयातील (HV Desai College) विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ‘चॅम्पियन ट्रॉफी’ (Champions Trophy) सलग दुसऱ्यांदा पटकावली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्पर्धेचे उद्घाटन मराठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) आणि संस्थेचे उपाध्यक्ष जनक शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव हेमंत मणियार,उपसचिव दिलीप जग्गड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गुरव तसेच सर्व शाखांचे उपप्राचार्य इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

 

‘देसाई करंडक’ (Desai Trophy) स्पर्धेत सी चॅम्पियन,वेब मास्टर, डिबेट, काउंटर स्ट्राइक, Ad-Mad, थ्री मिनिट्स मूवी क्लिप अशा टेक्निकल व नॉन टेक्निकल स्पर्धांचा समावेश होता. विद्या प्रतिष्ठान बारामती (Vidya Pratishthan Baramati), वीसीएसीएस, सिंहगड इन्स्टिट्यूट (Sinhagad Institute), मॉडर्न कॉलेज (Modern College) इत्यादी महाविद्यालयातील 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

 

स्पर्धेतचे आयोजक असलेल्या एच व्ही देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत
‘चॅम्पियन ट्रॉफी’ सलग दुसऱ्यांदा पटकावली.
पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा व जागतिक ख्याती असलेले आयटी अभियंता आणि
प्रसिद्ध लेखक डॉक्टर दीपक शिकारपूर (Deepak Shikarpur) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली.
उपप्राचार्य सोनी, प्राध्यापिका ज्योती मालुसरे आणि स्वप्निल सांगोरे यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Desai Trophy | HV Desai College wins Desai Cup ‘Champion Trophy’

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | मुंबई पोलीस उपायुक्ताच्या नावाने महिलेला लाखोंचा गंडा, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

Jayant Patil | जयंत पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, म्हणाले – ‘पुढील 48 तासांत…’

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंच्या ‘फडतूस गृहमंत्री’ वक्तव्यावरुन भाजप नेते आक्रमक, म्हणाले -‘आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाही ‘काडतूस’ आहेत’

 

Related Posts