IMPIMP

Dharavi Redevelopment Project | धारावीची जमीन गौतम अदानींची होणार का? कोट्यवधीच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टवर आली मोठी अपडेट

by sachinsitapure

नवी दिल्ली : Dharavi Redevelopment Project | मुंबईत वसलेली आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, धारावीचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे निकटवर्तीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. परंतु, यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी आरोप केला आहे की, धारावीची जमीन हडपण्याचा कट रचला जात आहे. धारावीची जमीन गौतम अदानी यांना दिली जाईल. या आरोपानंतर आता सरकारी सूत्रांनी खुलासा केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीच्या न्यूज पोर्टलवर देण्यात आले आहे.

अदानी केवळ डेव्हलपर

सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, यामध्ये केवळ रिडेव्हलपमेंट आहे, अदानी ग्रुपला लँड ट्रान्सफर होणार नाही. प्रोजेक्टमध्ये भूखंड हस्तांतरण महाराष्ट्र सरकारच्या विभागांना केले जाणार आहे.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, अहमदाबादचा ग्रुप केवळ एका प्रकल्प डेव्हलपर म्हणून घरे बांधणार आहे, जी सरकारी विभागांना सोपवली जातील. नंतर या घरांचे वाटप धारावी झोपडपट्टीतील रहिवाशांना केले जाईल. खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात जमीन हडपण्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर या प्रकल्पाशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, भूखंड केवळ राज्य सरकारच्या घरकुल विभागाच्या धारावी धारावी पुनर्विकास प्रकल्प/स्लम पुनर्वसन प्राधिकरण (डीआरपी/एसआरए) यांना हस्तांतरीत केले जातील.

अदानी समुहाने खुल्या आंतरराष्ट्रीय बोलीत धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मिळवला. समुह आपली सह कंपनी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. (डीआरपीपीएल) च्या माध्यमातून घरे आणि व्यवसायिक ठिकाण उभारेल आणि ती पुन्हा डीआरपी/एसआरएला सुपुर्द करेल.

Related Posts