IMPIMP

Diabetes | जेवणानंतर केवळ 5 मिनिटे करा हे काम, नियंत्रणात राहील डायबिटीज

by nagesh
Diabetes | diabetes 2 minutes of walking after a meal can help control blood sugar levels

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Diabetes | जेवणानंतर थोडा वेळ चालल्याने ब्लड शुगर लेव्हल पातळी कमी होऊ शकते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे (Diabetes). स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनात, संशोधकांनी दीर्घकाळ बसण्याऐवजी उभे राहणे आणि चालणे यासारख्या हलक्या शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन आणि रक्तातील साखरेच्या पातळीसह हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो यावरील सात वेगवेगळ्या अभ्यासांचे विश्लेषण केले (Diabetes control tips).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संशोधनाचे परिणाम पाहता, संशोधकांनी सुचवले की दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घेतल्यानंतर, बसणे किंवा झोपण्याऐवजी, 2 ते 5 मिनिटे हलके चालणे ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Levels) सुधारू शकते. याशिवाय जेवण केल्यानंतर थोडावेळ उभे राहिल्यास ब्लड शुगर लेव्हलही कमी होऊ शकते.

 

या अभ्यासाचे लेखक एडन बुफे यांनी आरोग्य वेबसाइटला सांगितले की, लाईट अ‍ॅक्टिविटीज तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

 

लाईट अ‍ॅक्टिविटीज ब्लड शुगर लेव्हल कशी कमी करू शकतात?
जेव्हाही तुम्ही काही खाता – विशेषत: जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू लागते. याला पोस्टप्रॅन्डियल स्पाईक म्हणून ओळखले जाते. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढल्याने इन्सुलिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो, जो रक्ताद्वारे पेशींमध्ये ग्लुकोज पाठवतो जेणेकरून त्याचा ऊर्जेसाठी वापर करता येईल. (Diabetes)

 

परंतु ब्लड शुगर लेव्हल आणि इन्सुलिनमधील हे संतुलन अतिशय नाजूक आहे आणि ते नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, जर शरीरात ब्लड शुगर लेव्हल सतत वाढत असेल तर पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे थांबवू शकतात आणि इन्सुलिन प्रतिरोधक बनू शकतात. ज्यामुळे प्री-डायबेटिक किंवा टाईप 2 मधुमेह होऊ शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशावेळी, या नवीन अभ्यासाच्या लेखकाचे म्हणणे आहे की जर तुम्ही जेवणानंतर हलके चाललात तर ते ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा (Diabetes, Heart Disease) धोका कमी होऊ शकतो.

 

संशोधकांना असे आढळून आले की जेवणानंतर बसण्याऐवजी थोडावेळ चालणे किंवा उभे राहणे यामुळे ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. परंतु, या अभ्यासाच्या लेखकाच्या मते, हलके चालणे खूप फायदेशीर ठरू शकते, ते जेवणानंतर इन्सुलिनची पातळी देखील सुधारते.

 

शेवटी, संशोधकांनी असे सुचवले आहे की जेवणानंतर हलके चालणे केवळ ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते,
तसेच इन्सुलिनची पातळी देखील राखू शकते.
याशिवाय या अभ्यासाच्या लेखकाने असेही म्हटले आहे की दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने चालणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

 

शक्य असल्यास दिवसभरात बसण्याची वेळ कमी करा, असेही बुफे म्हणाले.
जर तुमचे काम बैठे असेल, तर दर 20 ते 30 मिनिटांनी उठून थोडे चालत जा.

 

ब्लड शुगर लेव्हल या मार्गांनी करा नियंत्रित
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करणे फार महत्वाचे आहे. त्याच वेळी,
तुम्हाला मधुमेहाची समस्या असली तरीही, ब्लड शुगर लेव्हल राखणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला व्हिजन लॉस,
हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीच्या (Heart Attack, Stroke, Kidney) आजारांना सामोरे जावे लागणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या हेल्थ केअर प्रोग्रामच्या उपाध्यक्ष लॉरा हिरोनिमस यांनी सांगितले की,
ब्लड शुगर लेव्हल मॅनेज केल्याने भविष्यात मधुमेहाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
लॉरा यांनी असेही सांगितले की दिवसभर ब्लड शुगर लेव्हल राखल्याने एनर्जी लेव्हल देखील बूस्ट होते.

सीडीसीच्या मते, दिवसभर ब्लड शुगर लेव्हल राखण्यासाठी, भरपूर फळे आणि भाज्यांसह निरोगी आहार घेणे,
निरोगी वजन राखणे आणि नियमित शारीरिक हालचालींमध्ये भाग घेणे महत्वाचे आहे. याशिवाय या गोष्टीही लक्षात ठेवा –

 

तुमची ब्लड शुगर लेव्हल ट्रॅक करत रहा.
दिवसभर काहीतरी खात राहा, उपाशी राहण्याची चूक करू नका.
ज्यूस, सोडा किंवा अल्कोहोल ऐवजी पाणी प्या.

 

Web Title :- Diabetes | diabetes 2 minutes of walking after a meal can help control blood sugar levels

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उध्दव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘फोटो काढायला लोकांच्या जवळ यायला लागतं’

How To Control Diabetes | ICMR ने सांगितला डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याचा 55-20 चा मंत्र, आजपासूनच खाण्यात सुरू करा

CM Eknath Shinde | याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

 

Related Posts