IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उध्दव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘फोटो काढायला लोकांच्या जवळ यायला लागतं’

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे मुख्यमंत्री सध्या लोकांसोबत फोटो काढण्यात आणि गणेश मंडळांना भेटी देण्यात व्यस्त आहेत. राज्याचा कारभार ठप्प पडला आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं. लोक मला आपुलकीनं बोलवत असतात त्यामुळे त्यांना नाकारता येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला. वरळीतील पोलीस वसाहतीतील (Police Colony Worli) गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, मी गणेश मंडळांना भेटी द्यायला आणि फिरायला लागल्यामुळेच आज इतर सगळे फिरत आहेत. माझ्यामुळेच त्यांना पुण्य लाभत असेल तर ते त्यांनी घ्यावं. आपल्याला आपुलकीनं माणसं बोलवत असतात त्यांना नाकारता येत नाही. शेवटी मी नागरिकांना त्यांच्यातला माणूस वाटतो म्हणून ते माझ्याजवळ येऊन फोटो काढण्याची (Take Photo) इच्छा व्यक्त करत असतात. त्यांच्या कार्यक्रमांना बोलवत असतात. लोकांमध्ये राहणारा मी माणूस आहे. त्यामुळे गणेश मंडळांना भेटी दिल्या . आता इतरही लोक फिरु लागलेत, अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं.

 

 मुंबई (Mumbai) असो पुणे (Pune) असो सर्व ठिकाणी उत्सवाचा जोरदार उत्साह आहे.

 

पावसातही लोकांचा उत्साह दुणावलेला आहे.
पुण्यात नागरिकांचे स्वागत स्वीकारण्यासाठी मी लोकांमध्ये गेलो तर फोटो काढण्यासाठी गेले अशी टीका झाली.
पण फोटो काढण्यासाठीपण लोक जवळ यायला लागतात ना, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

 

राज्याला दोन मुख्यमंत्र्याची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे जे मंत्रालयात बसून काम करतील, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या टीकेलाही शिंदे यांनी उत्तर दिलं.
आता आधी सरकार कुणाचं होतं आणि कोण चालवत होतं, हेही आपल्याला माहित आहे.
नियंत्रण सुटल्यामुळे आता आमच्यावर टीका केली जात आहे. आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आशीर्वाद आहे.
यापुढे होणारे सगळे उत्सव हे निर्बंधमुक्त असतील, अशी घोषणा शिंदे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde slams shivsena chief uddhav thackeray said one has to go close to people to take pictures

 

हे देखील वाचा :

How To Control Diabetes | ICMR ने सांगितला डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याचा 55-20 चा मंत्र, आजपासूनच खाण्यात सुरू करा

CM Eknath Shinde | याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

Milk Cream Benefits | चेहर्‍यावर मलई लावल्याने होतात 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts