IMPIMP

Digital Currency vs Cryptocurrency | क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये फरक काय?, जाणून घ्या

by nagesh
Digital Currency vs Cryptocurrency | digital currency vs cryptocurrency what the row is all about

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Digital Currency vs Cryptocurrency | नुकतंच 1 फेब्रुवारी रोजी 2022-2023 चा अर्थसंकल्पाची (Budget 2022) घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली आहे. यावेळी त्यांनी डिजिटल मालमत्ता (Digital Assets) ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि एनएफटीचा (NFT) समावेश आहे. याबाबत घोषणा केली. त्यांच्या हस्तांतरणाच्या कोणत्याही उत्पन्नावर 30 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. संबधित घोषणेमुळे बहुतेक क्रिप्टो आणि एनएफटी गुंतवणूकदार त्यांच्या मालमत्तेच्या भविष्याबद्दल विचार करत होते. दरम्यान, क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये (Digital Currency vs Cryptocurrency) नेमका फरक काय? याबाबत जाणून घ्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

RBI लवकरच स्वतःचे डिजिटल चलन आणणार आहे, ज्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हटले जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषणेवेळी म्हणाल्या. तसेच, RBI च्या डिजिटल चलनामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. डिजिटल चलनामुळे अधिक कार्यक्षम आणि स्वस्त चलन व्यवस्थापन प्रणालीही निर्माण होईल. डिजिटल मालमत्तेसाठी कर आकारणीच्या घोषणेनंतर लगेचच CBDC च्या घोषणेने CBDC वरही कर आकारला जावा या विचारात अनेक लोक गोंधळले आहेत. पण, तसे अजिबात नाही. डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सी अथवा NFT सारख्या डिजिटल मालमत्ता नाहीत. डिजिटल चलन हे सरकारच्या माध्यमातून जारी केलेल्या चलनाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहेत, तर क्रिप्टोकरन्सी हे मूल्याचे भांडार आहे जे एनक्रिप्शनद्वारे संरक्षित आहे. लोकांनी वापरण्यास सुरुवात केलेली डिजिटल वॉलेट, विशेषत: महामारीच्या काळात, त्यात डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सी दोन्ही असू शकतात. पण, ते खरोखर बदलण्या योग्य नाही. (Digital Currency vs Cryptocurrency)

 

तर, 2 पक्षांमधील संपर्करहित व्यवहारांत डिजिटल चलन वापरले जाऊ शकते. तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देणे. सर्व ऑनलाइन व्यवहारांत डिजिटल चलनाचा समावेश होतो, एकदा तुम्ही ते पैसे बँकेतून अथवा एटीएममधून काढले की, ते डिजिटल चलन रोख रकमेत बदलते. क्रिप्टोकरन्सी अथवा डिजिटल नाणी हे मूल्याचे भांडार आहे जे एन्क्रिप्शनच्या माध्यमातून संरक्षित आहे.

डिजिटल चलनाला (Digital currency) एन्क्रिप्शनची आवश्यकता नाही. मात्र, हॅकिंग आणि चोरीची शक्यता कमी करण्यासाठी सर्व वापरकर्त्यांनी त्यांचे डिजिटल वॉलेट आणि बँकिंग अ‍ॅप्स मजबूत पासवर्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह सुरक्षित करणे गरजेचे आहे. हेच डेबिट आणि क्रेडिट कार्डांना (Debit And Credit Cards) लागू होते. दरम्यान, क्रिप्टोकरन्सी मजबूत एन्क्रिप्शनच्या माध्यमातून संरक्षित आहेत आणि क्रिप्टोमध्ये व्यापार करण्यास सक्षम होण्यासाठी, वापरकर्त्यांकडे पैशासोबत एक बँक खाते असणे आवश्यक आहेत. हे डिजिटल चलन ऑनलाइन एक्सचेंजद्वारे एक्सचेंज केले जाऊ शकते जेणेकरून संबंधित मूल्याच्या क्रिप्टोकरन्सी प्राप्त केली जाऊ शकते. जेव्हा नियमनाचा विचार केला जातो त्यावेळी, डिजिटल चलनांना भारतातील केंद्रीय प्राधिकरणाचा पाठिंबा असणार आहे, जो RBI असेल. RBI लिक्विड, रोख आणि डिजिटल चलन या दोन्ही व्यवहारांचे नियमन करतेय.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत ही एक विकेंद्रित प्रणाली आहे आणि ती केंद्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून नियंत्रित केली जात नाहीये.
सर्व क्रिप्टो व्यवहार विकेंद्रित लेजरमध्ये रेकॉर्ड केले जातात जे सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
स्थिरतेच्या आघाडीवर व्यवहारांच्या बाबतीत डिजिटल चलन स्थिर आणि व्यवस्थापित करणे सोपे आहे.
कारण ते जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जातात. दुसरीकडे क्रिप्टो खूप अस्थिर आहे आणि दर साधारण सतत वाढतात आणि कमी होतात.
डिजिटल चलन व्यवहारांचे तपशील फक्त सहभागी लोक, प्रेषक आणि प्राप्तकर्ता आणि बँक यांना उपलब्ध आहेत.
विकेंद्रीकृत लेझरच्या माध्यमातून क्रिप्टो व्यवहारांचे (Transactions) तपशील लोकांसाठी समोर आहेत.

 

Web Title :- Digital Currency vs Cryptocurrency | digital currency vs cryptocurrency what the row is all about

 

हे देखील वाचा :

Pune Crime | Thergaon Queen सोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड; पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी अन्…

Nashik Crime | नाशिकमधील धक्कादायक घटना ! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काढला काटा

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

 

Related Posts