IMPIMP

DNA Damaging Foods | शरीरात DNA डॅमेज करणारे इनफ्लेमेशन वाढवतात ‘या’ 4 गोष्टी, लवकरच डाएटमधून काढा बाहेर

by nagesh
DNA Damaging Foods | 4 foods that cause dna damaging inflammation in your body

सरकारसत्ता ऑनलाइन – DNA Damaging Foods | आपले शरीर रोगाशी लढण्यासाठी आणि जखमा बरे करण्यासाठी इनफ्लेमेशन वापरते, परंतु क्रॉनिक किंवा दीर्घकालीन इनफ्लेमेशन आपल्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे डीएनए (DNA) खराब होतो आणि कर्करोगाचा धोका (Risk of Cancer) वाढतो. हे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवते (Increases Insulin Resistance), ज्यामुळे मधुमेहाचा धोका (Risk Of Diabetes) वाढतो. यासोबतच हृदयाचे आजारही (Heart Disease) माणसाला घेरतात (DNA Damaging Foods).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डॉक्टर म्हणतात की, शरीरातील इनफ्लेमेशन वाढणे (DNA Damaging Foods) हे आपल्या आहारावर अवलंबून असते. त्यामुळे इनफ्लेमेशन होऊ नये म्हणून काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

 

1. शुगर फूड (Sugar Food)
साखर (Sugar) किंवा रिफायनरी फूड (Refinery Food) दोन प्रकारे इनफ्लेमेशन (inflammation) वाढवण्याचे काम करते. साखर तुमच्या लिव्हरमध्ये फॅटी अ‍ॅसिड (Fatty Acid) उत्पादन वाढवते. वेलोंडा अँडरसन (Velonda Anderson), सीईओ आणि पोषणतज्ञ (CEO and Nutritionist), स्वीट पोटॅटो डिलाईट (Sweet Potato Delight) यांच्या मते, शरीर जेव्हा हे फॅटी अ‍ॅसिड पचवते तेव्हा तयार होणारी कम्पाऊंड इनफ्लेमेशन (Compound Inflammation) इनफ्लेमेशन ट्रिगर (Inflammation Trigger) करतात.

 

दुसरे म्हणजे, गोड खाल्ल्याने आपले शरीर अधिक इन्सुलिन हार्मोन (Insulin Hormone) तयार करते, ज्यामुळे शरीरातील चरबी (Fat) वाढते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मेडिकल सेंटर्सचे (University of Washington Medical Centers) क्लिनिकल आहारतज्ञ डायनी जावेली (Diane R. Javelli) म्हणतात, ही समस्या आहे, कारण चरबीच्या पेशी इनफ्लेमेशन वाढवणारी रसायने तयार करतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

2. रेड मीट किंवा प्रोसेस्ड मीट (Red Meat Or Processed Meat)
अँडरसन म्हणतात की प्रोसेस्ड मीट (Processed Meat) ते मांस आहे जे बनवण्यासाठी सॉल्टिंग (Salting), स्मोकिंग (Smoking) आणि अनेक प्रकारची केमिकल (Chemicals) वापरली जातात. बेकॉन (Bacon), डेली मीट (Daily Meat), हॉट डॉग (Hot Dog), बीफ जर्की (Beef Jerky) आणि चिकन नगेट्स (Chicken Nuggets) ही प्रोसेस्ड मीटची काही उदाहरणे आहेत.

 

प्रोसेस्ड आणि रेड मीट दोन्हीमध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट (High Saturated Fat) आढळते. यामुळे वजन वाढते आणि इनफ्लेमेशनची समस्याही निर्माण होईल.

 

3. कुकिंग ऑईल (Cooking Oil)
कुकिंग ऑईलमध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड (Omega-6 Fatty Acid) नावाचा घटक आढळतो. ओमेगा-6 फॅट्स शरीरासाठी हानिकारक नसते. शरीर ऊर्जा (Energy) निर्माण करण्यासाठी आणि सामान्य वाढीसाठी त्याचा वापर करते. परंतु शरीरातील ओमेगा-3 फॅट्सचा (Omega-3 Fats) समतोल राखणे आवश्यक आहे. सॅल्मन फिश (Salmon Fish) आणि फ्लेक्ससीड (Flax seed) हे याचे चांगले स्रोत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ओमेगा-6 चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने देखील इनफ्लेमेशन होण्याची समस्या वाढू शकते.
हे टाळायचे असेल, तर त्यासाठी मका (Corn), कॅनोला (Canola), सूर्यफूल (Sunflower),
करडई आणि शेंगदाणा तेलाचे (Peanut oil) अतिसेवन बंद केले पाहिजे.

 

4. फ्राईड फूड (Fried food)
चिकन नगेट्स (Chicken Nuggets), डोनट्स (Donuts), फ्रेंच फ्राईज (French Fries) सारखे तळलेले पदार्थ इनफ्लेमेशन वाढवण्याचे काम करतात.
तळलेल्या पदार्थांमध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यात ट्रान्स फॅट देखील असू शकते.
तळलेले पदार्थ शरीरात AGE नावाच्या कम्पाऊंडचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे शरीरात इनफ्लेमेशन होण्याची समस्या वाढते.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- DNA Damaging Foods | 4 foods that cause dna damaging inflammation in your body

 

हे देखील वाचा :

Maharashtra Budget 2022 | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात केल्या ‘या’ मोठ्या घोषणा!

Reason Behind Tingling In Hands | ‘या’ कारणांमुळे येतात हाता-पायांना मुंग्या, दुर्लक्ष करण्याची करू नका चूक; जाणून घ्या

Pune Municipal Corporation (PMC) | लहान – मोठ्या पथारी व्यावसायिकांना PMC च्या मुख्यसभेचा दिलासा, मात्र…

 

Related Posts