IMPIMP

Maharashtra Budget 2022 | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात केल्या ‘या’ मोठ्या घोषणा!

by nagesh
Maharashtra Karnataka Border Issue | 660 rounds of ST running Kolhapur Karnataka cancelled

सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Budget 2022 | मागील 4-5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर (ST Workers Strike) अद्यापही कोणता तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन हमी आणि वेतन निश्चितीची अट मान्य करून त्यानुसार आदेश दिले. मात्र विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्य सरकार (Maharashtra Government) ठाम नसून न्यायालयात (Mumbai High Court) लढा चालू आहे. त्यामुळे यंदा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटी महामंडळासाठी (MSRTC) कोणत्या घोषणा होतात. याकडे सर्वांचं लक्ष लागल होतं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (ajit Pawar) अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये एसटी महामंडळासाठी 3 हजार पर्यावरणपूरक (Eco-friendly Bus) बस उपलब्ध करणार आहेत. त्यासोबतच राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये (Maharashtra Budget 2022) परिवहन विभागासाठी 3 हजार तीन कोटी आणि एसटी महामंडळातील कर्मचारी वर्गाच्या मासिक पगारासाठी 4 हजार 107 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच बस स्थानकांचा दर्जा सुधरवण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी (Reconstruction) अर्थसहाय्य (Financial aid) उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

 

दरम्यान, विद्युत वाहनांची (Electric vehicles) संख्या वाढवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव (Proposal) ठेवण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. 2025 पर्यंत राज्यात 5 हजार विद्युत चार्जिंग स्टेशन (Charging station) वाढवणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Budget 2022 | maharashtra budget 2022 special announcement for st workers msrtc ajit pawar thackeray government

 

हे देखील वाचा :

Reason Behind Tingling In Hands | ‘या’ कारणांमुळे येतात हाता-पायांना मुंग्या, दुर्लक्ष करण्याची करू नका चूक; जाणून घ्या

Pune Municipal Corporation (PMC) | लहान – मोठ्या पथारी व्यावसायिकांना PMC च्या मुख्यसभेचा दिलासा, मात्र…

Gopichand Padalkar | ‘शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत, देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात’ – गोपीचंद पडळकर

 

Related Posts