IMPIMP

Dr. Baba Adhav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची (UBT) मागणी

by nagesh
Dr. Baba Adhav | Shiv Sena's (UBT) demand to give Maharashtra Bhushan Award to Dr. Baba Adhaav

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Dr. Baba Adhav | “ महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा.बाबा आढाव (Dr. Baba Adhav) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देण्यात यावा’, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे,उपप्रमुख डॉ.अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले,त्यानंतर ही मागणी केली.यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.गजानन थरकुडे,उत्तम भुजबळ,विशाल धनावडे,पल्लवी जावळे,पृथ्वीराज सुतार,बाळा ओसवाल,अशोक हरणावळ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी च्या अ‍ॅड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या .

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘गेली नऊ दशके अव्याहतपणे फुले विचारांची कास धरून सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे डॅा. बाबा आढाव (Dr. Baba Adhav) हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस आहेत. फुले जयंती प्रसंगी बाबा आढाव यांच्यासारख्या ऋषितुल्य वक्तित्वाचा सन्मान करणे म्हणजे आपला प्रबोधनकारी वारसा जपणे होय.येणाऱ्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार देऊन सन्मान व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे.या मागणीचा आदर करत सरकारने त्वरित तशी घोषणा करावी आणि समविचारी सर्व लोकांनी या संदर्भात तशी निवेदने माध्यमातून मुख्यमंत्री व सरकारकडे करावी’, असे या पत्रकात म्हटले आहे.

 

‘सत्यशोधक’ विचारांचा हा वारसा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अमुल्य असा ठेवा आहे.
महापुरूषांच्या प्रतिमेचा-कार्याचा गुणगौरव तर आपण त्यांच्या जन्मदिनी करतोच परंतू त्यांच्या विचारांना पुढे
घेऊन जाणे हिच त्यांच्याप्रति खरी कृतज्ञता ठरेल’, असे या पत्रकात म्हटले आहे.

 

 

Web Title :-  Dr. Baba Adhav | Shiv Sena’s (UBT) demand to give Maharashtra Bhushan Award to Dr. Baba Adhaav

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी व तिच्या 2 लहान मुलांचा खून करणार्‍याला कोंढवा पोलिसांकडून अटक

Pune PMC Property Tax | पुणेकरांना घरपट्टी 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व सावकारी व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

 

 

Related Posts