IMPIMP

Pune PMC Property Tax | पुणेकरांना घरपट्टी 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व सावकारी व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

by nagesh
Pune PMC Property Tax | Prabhu Ramchandra to restore the 40% discount on house rents to Pune residents and reduce Pune PMC Property Tax

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Property Tax | पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना1970 सालापासून 40% घरपट्टी सूट मिळत होती.
तथापि गेली पाच वर्ष ती बंद करण्यात आली आहे. पुणेकरांना मिळणारी 40% सवलत पुन्हा सुरू ठेवावी यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली. काँग्रेस
पक्षाने (Congress Pune) सहीची मोहीम राबवली. देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना निवेदन दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील
(Chandrakant Patil) यांना पत्र पाठविले. परंतु पाच वर्षे त्यांनी दुर्लक्ष केले होते. कसब्यात (Pune Kasba Bypoll) भाजपाचा (BJP Pune) पराभव
झाल्यावर पालकमंत्र्यांनी मागील महिन्यात याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन ती पूर्ववत चालू ठेवावी अशी मागणी केली. (Pune PMC Property Tax)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परंतु कॅबिनेटमध्ये लगेच निर्णय घेतो असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा एक महिना लोटला पुणेकरांना याचा आर्थिक बोजा नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी पुणेकर नागरिकांच्या वतीने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) व आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या नेतृत्वाखाली तुळशीबाग राम मंदिरत, राज्य सरकारला 40% पट्टीतील सवलत सुरू ठेवावी व सावकारी व्याज कमी करावे त्यासाठी आरती करून साकडे घालण्यात आले. यावेळी मोहन जोशी म्हणाले की पुणेकर नागरिकांच्या साठी आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केलीत. मग ते रस्त्यावरील खड्ड्यांच्या असो व पाणीपुरवठा बाबत असो सरकारचे नेतृत्व करणारे नुकतेच आयोध्या वारी करून आलेत आमची म्हणजेच पुण्याचे तुळशीबागेतील राम मंदिर आहे. (Pune PMC Property Tax)

 

 

आमदार यांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले भरमसाठ टॅक्स लावून ते छळत आहेत.40% सवलती सोबत 500 स्वे. फीट घरांना टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरणार असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस संजय बालगुडे (Sajay Balgude) यांनी केले होते. यावेळी मंदिरात रामाची आरती करण्यात करिता आरतीला 40 ते 50 कार्यकर्ते हजर होते असे पत्रक संजय बानगुडे यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC Property Tax | Prabhu Ramchandra to restore the 40% discount on house rents to Pune residents and reduce Pune PMC Property Tax

 

हे देखील वाचा :

NCP MP Supriya Sule | दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाल्या-‘पाऊस पडेल का हे मी सांगू शकत नाही, आता मात्र…’

Maharashtra Krushi Panan Mandal | महाराष्ट्रातील केशर व बैगनपल्ली आंबा जपान अन् अमेरिकेला रवाना

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीचे 11 जूनला आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान

Dr. Babasaheb Ambedkar Samarpan Award | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांना जाहीर

 

Related Posts