IMPIMP

DGP Sanjay Pandey | संजय पांडे पोलीस महासंचालक पदासाठी अपात्र? राज्याला नवीन DGP मिळण्याची शक्यता

by nagesh
IPS Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey discusses mumbaikar's issues

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांचे पद धोक्यात आले आहे. संजय पांडे हे पोलीस महासंचालक (DGP Sanjay Pandey) पदासाठी पात्र नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission) म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस महासंचालक पदावर रुजू झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे क्लिअरन्स (Clearance) लागते. जे संजय पांडे यांना मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन महासंचालक (Maharashtra New DGP) मिळणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या संदर्भात मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने उत्तर दिले आहे. संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याने महासंचालक पदासाठी रजनीश सेठ  (Rajneesh Seth), डॉ. व्यंकटेशम  (Rajneesh Seth) आणि हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) या तीन अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती आहे. परंतु काही राज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाला बगल दिली आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री (CM) हेच अंतिम निर्णय घेऊ शकतात, असे देखील बोलले जात आहे.

 

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सरकारी सेवेतून मध्यंतरी अवकाश घेऊन दोन वर्षे खासगी क्षेत्रात (private sector) सेवा केली होती. दोनदा सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेर ही भीती खरी ठरली आहे. लोकसेवा आयोगाच्या 1 नोव्हेंबरला झालेल्या शिफारसी या 10 नोव्हेंबरच्या सुमारास मुंबईत पोहचल्या आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

संजय पांडे यांना महासंचालक पदावरून पायउतार व्हावे लागले तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ (rajnish seth), गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. के व्यंकटेशम (dr k venkatesham) आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांच्यापैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती मिळू शकते.

 

तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल (subodh kumar jaiswal) हे जानेवारी 2021 मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर लगेच हेमंत नगराळे यांच्याकडे डीजीपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र यूपीएससीकडे मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला गेला नाही. माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपानंतर परमबीर सिंह (Parambir Singh) यांची आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 10 एप्रिल रोजी संजय पांडे यांना कार्यवाहक डीजीपी (DGP) बनवण्यात आले. त्यानंतर 18 मार्च रोजी यूपीएससीकडे 1986 ते 1989 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) 12 अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

 

– आयआयटी कानपूरमधून आयटी कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण

 

– 1986 च्या बॅचमधील आयपीएस (IPS) अधिकारी

 

– पुणे शहरातून सहायक पोलीस आयुक्त (Pune ACP) म्हणून कामाला सुरुवात

 

– त्यानंतर मुंबईतील डीसीपी (DCP) रँकचे अधिकारी बनले

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

– 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची (Mohalla Samiti) स्थापना

 

– 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या (Shri Krishna Commission) अहवालात आहे.

 

– मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे होते. जवळपास तीन वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला.

 

-1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

– 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी (DCP Narcotics Department) असताना शहरातील ड्रग्स रॅकेटला आळा घातला

 

– 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला

 

– 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात (Howard University) गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

 

– 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Former PM Atal Bihari Vajpayee) यांच्या सुरक्षेत तैनात होते.

 

– 2001 मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

– 2005 मध्ये पुन्हा सेवेत आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षाच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक…

 

Web Title :- dr k venkateshamDGP Sanjay Pandey | DGP sanjay pandey disqualified for post of director general of police maharashtra to get new dgp rajnish seth dr k venkatesham dr k venkatesham

 

हे देखील वाचा :

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

PMGKAY | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 80 कोटी लोकांना पुढील वर्षी मार्चपर्यंत मिळेल 5 किलो मोफत रेशन

Mumbai Crime | धक्कादायक ! बांगलादेशातून 5 हजार मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात अडकवलं; अखेर आरोपीला अटक

 

Related Posts