IMPIMP

Dr. Neelam Gorhe | जनतेच्या मनामधील सिंहासनावर फक्त ठाकरे आणि शिवसेना हेच नाव लिहिलेले आहे आणि असेल – डॉ. नीलम गोऱ्हे

by nagesh
 Dr. Neelam Gorhe | Only Thackeray and Shiv Sena's name is and will be written on the throne in the minds of the people - Dr. Neelam Gorhe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुरंदर मधील जनता आणि येथील शेतकरी बांधवांनी शिवसेनेवर (Shivsena) सातत्याने प्रेम केलेले आहे. जनतेच्या मनामधील जे सिंहासन आहे त्याच्यावर फक्त ठाकरे (Thackeray) आणि शिवसेना हेच नाव लिहिलेले आहे आणि कायम असेल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी पुरंदर येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सभेत केले. पुणे ग्रामीण (Pune Rural) आणि पुरंदर विधानसभा (Purandar Vidhan Sabha) येथील पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज सासवड येथे शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) बोलत होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुरंदर तालुक्यातील माजी आमदार हे मी शिवसेना सोडली असे जाहीर सांगतात आणि ज्या गटात ते गेले ते सांगतात आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. परंतु येथील शिवसेनेच्या आमदाराने सांगितले की शिवसेनेतून बाहेर पडले आहेत त्यांनी शिवसेना सोडली आहे .या सर्वांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) कधीच माफ करणार नाहीत. पुढील काळात न्यायालयातून नक्कीच शिवसेनेला न्याय मिळेल. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असा विश्वास डॉ. गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी मेळाव्यात व्यक्त केला.

 

पुरंदर येथील सर्व प्रश्नांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नेहमीच लक्ष आहे.
खंडोबा मंदिराचा आराखडा असेल, गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न असेल,
रस्त्यांचे विषय असतील या सर्वांवर बैठक घेऊन मार्ग काढण्याचे काम मी स्वतः केले आहे,
असे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
पूर्वीचे आमदार यांनी फक्त स्वतःचे हित जपले शिवसैनिकांना सातत्याने त्रास देण्याचे काम देखील त्यांनी केले आहे.
परंतु आता आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) आणि रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) आणि मी स्वतः,
पदाधिकारी आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचे जबाबदारी घेत असून सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना डॉ.गोऱ्हे यांनी आज विश्वास दिला.

 

यावेळी आ.सचिन अहिर, माजी आ.रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, राजेंद्र काळे, अविनाश बलकवडे,
स्वाती ढमाले, शंकरनाना हरपळे, उल्हास शेवाळे, रमेश जाधव, अभिजित जगताप, संदीप मोडक,प्रसाद खंडागळे,
राम झगडे, अमोल पांगारे, शादाब मुलाणी, किरण दावलकर ,गणेश वाघ, प्रशांत शेडकंर ,प्रकाश कटके,
विश्वास काटकर, सतिश बांदल,दादा कामे, पंढरीनाथ खोपडे, राजाभाऊ क्षीरसागर आदी शिवसैनिक,
पदाधिकारी आणि परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Dr. Neelam Gorhe | Only Thackeray and Shiv Sena’s name is and will be written on the throne in the minds of the people – Dr. Neelam Gorhe

 

हे देखील वाचा :

Pune Rural | पुणे जिल्ह्यात (ग्रामीण) 5 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Business Opportunity | मोदी सरकारच्या मदतीने लाखो कमावण्याची संधी, कसे उघडावे आपले जन औषधी केंद्र?

NCP Chief Sharad Pawar | मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शरद पवारांचा टोला

 

Related Posts