IMPIMP

Pune Rural | पुणे जिल्ह्यात (ग्रामीण) 5 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

by nagesh
Pune Crime | Women police personnel were abused with slippers and beaten

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Rural | पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्याच्या दृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी हिम्मत खराडे (Additional District Magistrate Himmat Kharade) यांनी 5 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory Order) जारी केले (Pune Rural) आहेत.

 

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य (Explosive substances) बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा राजकीय नेत्यांच्या (Political Leader) चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, जमाव तयार करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल
किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषण करणे,
अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल
अशा पद्धतीने कलम 37 (1) व (3) विरुद्ध वर्तन करणे, 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच पेक्षा जास्त
लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) पुणे ग्रामीण (Pune Rural)
यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.
हा संपूर्ण आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Rural | Prohibitory order in effect till August 5 in Pune District (Rural)

 

हे देखील वाचा :

Business Opportunity | मोदी सरकारच्या मदतीने लाखो कमावण्याची संधी, कसे उघडावे आपले जन औषधी केंद्र?

NCP Chief Sharad Pawar | मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शरद पवारांचा टोला

High Cholesterol झाल्यास शरीराराचा ‘हा’ भाग देतो 4 Warning Sign, चुकूनही करू नका दुर्लक्ष

 

Related Posts