IMPIMP

Dr. Neelam Gorhe | निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात धमकीचे पत्र, जाणून घ्या कारण

by nagesh
 Dr. Neelam Gorhe | Only Thackeray and Shiv Sena's name is and will be written on the throne in the minds of the people - Dr. Neelam Gorhe

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्य सरकारने (Maharashtra State Government) नुकताच विधवा (Widow) महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी दिली. परंतु, यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार करण्याची धमकी (Rape Threat) दिली जात असल्याची माहिती डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी दिली. त्या एका वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) पुढे म्हणाल्या, नगर जिल्ह्यातून आपल्याला धमकी आली आहे. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने जर विधवा महिलांना सन्मान करणारा निर्णय ( Maharashtra Government Widow GR)लागू होऊन त्याची अंमलबजावणी झाली, तर अशा महिलांवर आम्ही बलात्कार करु, अशी धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस योग्य ती कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.

 

विधवा महिलांच्या सन्मानासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढे यावे यासाठी शासनाने काढलेल्या दोन्ही निर्णयांचे ग्रामपंचायतींनी चावडी वाचन करावे, असे आवाहन त्यांनी पुण्यात झालेल्या दहा जिल्ह्यांच्या बैठकीत केले. या महिलांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पावले उचलली पाहिजेत तसेच पतीच्या निधनानंतर प्रतीके काढून न टाकण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी या बैठकीत केल्याचे सांगितले.

 

Web Title :- Dr. Neelam Gorhe | shivsena leader neelam gorhe office recived letter of rape threat on widow women

 

हे देखील वाचा :

Post Office FD | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त लाभ; जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल

Pune Crime | हुंड्याच्या व भिक मागण्याच्या उद्देशाने 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण, सराईत महिला आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांकडून अटक

GPRS in School Bus Mandatory | महाराष्ट्रात प्रत्येक स्कूलबसमध्ये आता ‘GPS’ बसवणे अनिवार्य; अप्पर पोलीस महासंचालकांनी दिल्या परिवहन विभागाला सूचना

 

Related Posts