IMPIMP

Firing In Nimbut Baramati | बारामती : शर्यतीचा बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या गोळ्या

by sachinsitapure

बारामती :  – Firing In Nimbut Baramati | शर्य़तीच्या बैलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावुन बिनसल्याने मध्यरात्री एकावर गोळीबार केल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबुत येथे घडली आहे. यामध्ये रणजीत एकनाथ निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (Vadgaon Nimbalkar Police Station) गौतम शहाजीराव काकडे (Gautam Shahajirao Kakade), गौरव शहाजीराव काकडे (Gaurav Shahajirao Kakade) यांच्यासह तीन अनोळखी तरुणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघेही भाऊ सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांची मुले आहेत. गुरुवारी रात्री अकरा ते शुक्रवारी पहाटे दोनपर्यंत घडलेल्या या प्रकरणाची अंकिता रणजीत निंबाळकर (वय-23) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. रणजीत निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद झाले. याच वादातून निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ज्यात निंबाळकर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

अंकिता निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एक वर्षापूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजीराव काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते.उर्वरित 32 लाख रुपये येणं बाकी होते.

दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी रणजित निंबाळकर गेले असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्यावरुन आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये रणजीत निंबाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts