IMPIMP

Gajanan Babar Passes Away | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु करणारे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by nagesh
Gajanan Babar Passes Away | Former MP Gajanan Babar, who started Shiv Sena's first branch in Pimpri Chinchwad, dies; Took his last breath at the age of 79 He was mavals first mp

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनGajanan Babar Passes Away | मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Lok Sabha constituency) माजी खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (Gajanan Babar Passes Away) यांचे आज (बुधवार) निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण (Corona Infection) झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी 3.25 मिनीटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री बाबर (Jayashree Babar) आणि दोन मुले असा परिवार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुळचे सातारा जिल्ह्यातील (Satara District) असलेले गजानन बाबर यांनी 1990 साली वाई मतदारसंघातून विधानसभा लढवली होती. त्यानंतर नव्वदच्या दशकात ते पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) राजकारणात स्थान निर्माण केले. एक कडवट शिवसैनिक (Shivsena) म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती. (Gajanan Babar Passes Away)

 

लहान व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी आदींच्या 40 संघटनांवर त्यांचा दबदबा होता.
याच ताकतीवर ते 3 वेळा नगरसेवक, हवेली मतदारसंघातून दोन वेळा आमदार (MLA) झाले.
तर 2009 मध्ये ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर (MP) निवडून गेले.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आझम पानसरे (Azam Pansare) यांचा पराभव केला.

 

Web Title :- Gajanan Babar Passes Away | Former MP Gajanan Babar, who started Shiv Sena’s first branch in Pimpri Chinchwad, dies; Took his last breath at the age of 79 He was mavals first mp

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | भाजपचे आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

Raj Thackeray | युतीबाबत राज ठाकरेंनी केलं महत्वाचं विधान, पदाधिकार्‍यांना म्हणाले…

Pune Crime | मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts