IMPIMP

Raj Thackeray | युतीबाबत राज ठाकरेंनी केलं महत्वाचं विधान, पदाधिकार्‍यांना म्हणाले…

by nagesh
Raj Thackeray | mns meeting ends raj thackeray instruct party leaders start municipal corporation election do not think about alliance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Raj Thackeray | आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS)
पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये (Mumbai) एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. त्यावेळी
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत काही सुचना केल्या आहेत. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

”तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. तुमच्या मनात विषय येत असेल युतीच काय होणार ?, युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. महापालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत रहा युती ही गोष्टीमध्ये अडकू नका.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

 

 

”निवडणुकीच्या दिवशी व्यवस्थापन कसं करायचं आहे या संदर्भातील कमिटी स्थापन करणार. उमेदवारांची नेमणूक कशी करणार ? या संदर्भातील चर्चा बैठकीत झाली. कमिटी स्थापन करून बैठका घेणार आहेत. गट अध्यक्ष यांच्या बैठक घेणार, 15 फेब्रुवारी पर्यंत अहवाल देणार आहोत.” असं बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितले आहे.

 

 

पुढे संदीप देशपांडे बोलताना म्हणाले, ”युती बाबात पढू नका असं सांगितलंय, स्वतंत्र्य लढण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने वॉर्ड रचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही. शिवसेनेसोबत मराठी माणसं, हिंदू लोकं आहेत सोबत? कितीही वॉर्ड रचना बदलल्या तरी आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत पण मरण अटळ आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Raj Thackeray | mns meeting ends raj thackeray instruct party leaders start municipal corporation election do not think about alliance

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Side Effects Of Spinach | हिवाळ्यात जास्त पालक खाल्ल्याने होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान, डायबिटीजसह ‘या’ रुग्णांनी व्हावे सावध

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाला अटक

NCP Prashant Jagtap | पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? NCP चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले…

 

Related Posts