IMPIMP

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

by nagesh
Gautam Gambhir | former indian cricketer and bjp mp gautam gambhir received death threats email from isis kashmir says delhi police DCP central Shweta Chauhan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gautam Gambhir | देशाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘इसिस काश्मीर’ (ISIS Kashmir) या संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गौतम गंभीर यांना धमकीचा मेल (Threat Mail) आला. त्यानंतर गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस (Delhi Police) याबाबत चौकशी करीत आहेत. (Gautam Gambhi received death threats from ISIS Kashmir)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

आयएसआयएस काश्मीरकडून (ISIS Kashmir) धमकी आलीय. ई-मेलवरून ही धमकी पाठवण्यात आली असल्याचं देखील गंभीरने सांगितलं आहे. दहशतवादी संघटनेनं गंभीरला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अधिकृत ई मेल आयडीवर (मंगळवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास धमकीचा मेल आला असल्याचं गंभीरने (Gautam Gambhir) पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार केली आहे.
यानंतर गंभीर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशी माहिती दिल्लीच्या डीसीपी श्वेता चौहान (DCP Shweta Chauhan) यांनी दिली आहे.

Web Title :- Gautam Gambhir | former indian cricketer and bjp mp gautam gambhir received death threats email from isis kashmir says delhi police DCP central Shweta Chauhan

 

हे देखील वाचा :

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव

PV Sindhu | ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू ‘या’ पदासाठी निवडणूक लढवणार

 

Related Posts