IMPIMP

Gold Silver Price Today : 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी ‘स्वस्त’, चांदी देखील घसरली; जाणून घ्या आजचे दर

by omkar

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. गेल्या सत्रातील घसरणीनंतर शुक्रवारी (दि. 4) पुन्हा एकदा सराफ बाजारात सोने- चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाल्याचे दिसून आले. एमसीएक्सवर वायदा बाजारातील सोन्याचा दर 0.12 टक्यांनी घसरून 48,619 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 70,722 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला आहे. सोन्याचा दर 2 दिवसांत 1 हजार रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा दर 2 हजारांनी कमी झाली आहे.

कल्याणमध्ये एका घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र, प्रचंड खळबळ

गेल्या सत्रात सोन्याचा दर 2 टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलोने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे 2 आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे. (Gold Silver Price)

स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे. गेल्या सत्रात यात 2 टक्क्यांची घसरण झाली होती. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 27.31 डॉलर प्रति औंसवर आली होती. प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 1,148.50 डॉलरवर आले होेते. (Gold Silver Price)

डॉलर इंडेक्स 3 आठवड्यात 90.543 वर पोहोचला आहे. दरम्यान कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे.

Also Read:- 

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश 

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

 

Related Posts