IMPIMP

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

by nagesh
Gunaratna Sadavarte | Great relief to Gunaratna Sadavarte Mumbai High Court Pune Bharti Vidyapeeth Police Station Case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gunaratna Sadavarte | एसटी कामगारांचे (MSRTC Worker) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. पुण्यात (Pune) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) मंजूर करण्यात आला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश हाय कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मराठा समाजाविषयी गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून पुण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हिंसक आंदोलन प्रकरणी सदावर्तेंना जामीन मिळूनही ते अद्याप जेलमध्ये आहेत. कारण अद्याप त्यांनी जामिनाच्या अटी शर्तीची पूर्तता केली नाहीये. मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य सदावर्तेंनीच केले होते हे तपासण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने (Maharashtra State Government) कोर्टाला सांगितले होते. पण, सातारा पोलिसांनी याबाबत दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतल्याने परत त्याची गरज काय? असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला.

 

मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये (Bharti Vidyapeeth Police Station) गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल असून, त्यासाठी सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस (Pune Police) कोल्हापूर कोर्टात दाखल झाले होते. पण, कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना झाले आहेत.

 

Web Title :- Gunaratna Sadavarte | Great relief to Gunaratna Sadavarte Mumbai High Court Pune Bharti Vidyapeeth Police Station Case

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केलेल्या आरोपांची ‘पोलखोल’; Mumbai CP संजय पांडेंनी केला ‘तो’ व्हिडीओ Tweet

Pune Crime | विमाननगर परिसरात खुनाचा प्रयत्न; विश्रांतवाडीमध्ये दहशत पसरवणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Diabetes Causing Foods | असाध्य आजार डायबिटीजचे मूळ आहे रोजच्या खाण्यातील ‘या’ 6 गोष्टी, माहित असूनही बिनदिक्कतपणे खातात लोक

 

Related Posts