IMPIMP

Harshvardhan Patil – Ajit Pawar | अजित पवारांनी अन्याय केला की नाही हे सगळ्यांना माहीत, महायुतीकडून इंदापूरात लढण्याची तयारी – हर्षवर्धन पाटील

by sachinsitapure

इंदापूर : Harshvardhan Patil – Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून (Indapur Assembly) वादंग निर्माण होऊ शकतो. अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्षन पाटील यांचे राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मध्यस्थीने हर्षवर्धन पाटलांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तर सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी प्रचार केला. इंदापूरमध्ये सगळे दिग्गज नेते एका बाजूला असतानाही सुनेत्रा पवारांना इंदापूरमधून लीड देता आले नाही. दरम्यान आता हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अद्याप महायुतीची बैठक झाली नाही. पण लवकरच बैठक होणार आहे. अजित पवारांनी अन्याय केला का नाही? हे आपल्याला सगळ्यांना माहीत असल्याचे वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. आता महायुती झाली आहे. अजूनही कोणत्याच प्रकारची जागा वाटप झाली नसल्याचे पाटील म्हणाले.

बैठकीनंतर लवकरच जागावाटपाच्या संदर्भात निर्णय होईल, ज्यावेळी निर्णय होईल त्यावेळी बघू. पण इंदापूरच्या जागेचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असे अजित पवारांनी सांगितले आहे. महायुती म्हणून आम्ही लढण्याची तयारी केली असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाचे चिंतन देखील सुरु असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) आमदार आहेत. महायुतीत सध्या सर्व काही आलबेल आहे अशी परिस्थिती नाही. त्यामुळे इंदापूरच्या जागेबाबत काय निर्णय होतो त्याबाबत वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटलांनी दूध दरवाढीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांना प्रस्ताव देऊन दुधाला ३५ रुपये प्रतिलीटर हमी भाव देण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव अधिवेशनात मान्य करावा अशी आमची आशा आहे. तसेच कायमस्वरुपी दुधाला ५ रुपयांचे अनुदान दिले पाहिजे. दूध पावडर एक्स्पोर्टला ५० रुपये प्रति टन अनुदान द्यावं” असेही ते म्हणाले. दरम्यान, २९ तारखेला विखे पाटील यांनी या प्रस्तावाबाबत बैठक आयोजित केली आहे. या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Related Posts