IMPIMP

Health Benefits Of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!

by sachinsitapure
Health Benefits of Guava

नवी दिल्ली : Health Benefits of Guava | प्रत्येक ऋतूची स्वतःची हंगामी फळे असतात. त्याचप्रमाणे हिवाळ्यातील फळ म्हणजे पेरू. हिवाळा सुरू होताच पेरूला मोहोर येतो. हे फळ जेवढे खायला चविष्ट, तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (Health Benefits of Guava)

फायबर समृद्ध पेरू पोट साफ करतो, बद्धकोष्ठता दूर करतो, तसेच पचनसंस्था देखील सुधारतो. पोटाशिवाय इतर अनेक आजारांवर पेरू खूप फायदेशीर आहे. लोकांना हिवाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतात, अशावेळी बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या होतात. पेरू चा आहारात समावेश केल्यास या समस्या टाळता येतील.

इतकंच नाही तर पेरूची पाने देखील गुणधर्माने परिपूर्ण असतात. हिवाळ्यात पेरू खाण्याचे चमत्कारिक फायदे जाणून घेऊया.

पेरू खाण्याचे ५ चमत्कारिक फायदे (Health Benefits of Guava)

डायजेशन सुधारते :

हिवाळ्यात पेरू खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. भरपूर फायबर असल्याने पेरू पोटाशी संबंधित समस्या दूर करतो. बद्धकोष्ठतेपासून आराम देतो. पेरू हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की पेरूच्या पानांचा रस अतिसारामध्ये खूप फायदेशीर आहे. आहारात पेरूचा समावेश करून इरिटेबल बोवेल सिंड्रोमपासून आराम मिळवू शकता.

इम्युनिटी बुस्ट करा :

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने शरीराची इम्युनिटी वाढते. संशोधनात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन सी बॅक्टेरियाशी लढण्यासाठी मदत करते.

मासिक पाळीत फायदेशीर :

अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान क्रॅम्पचा सामना करावा लागतो. पेरू आणि त्याच्या पानांचे सेवन केल्याने
या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पेरूचा वापर पेनकिलर्सपेक्षा प्रभावी आहे.

डायबिटीजवर प्रभावी :

डायबिटीजच्या रुग्णांना पेरू खाल्ल्याने फायदा होतो. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे.
यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखता येते. यातील फायबर शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते.

केस आणि दातांसाठी प्रभावी :

पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात. या पानांच्या वापराने केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते.
यासोबतच पेरूची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने दातदुखी आणि हिरड्या सुजच्या त्रासापासून आराम मिळतो.

Related Posts