IMPIMP

Health Tips | महिलांनी आरोग्याबाबत कधीही करू नयेत ‘या’ चूका, आजारांपासून रहाल दूर

by nagesh
Health Tips | health tips health mistakes women health and sugar free instead of sugar skip miles

सरकारसत्ता ऑनलाइन – Health Tips | असे म्हटले जाते की, माणूस हा चुकांचा पुतळा आहे. याचा अर्थ चुका करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे.
कधी कधी चुका सुद्धा आपल्याला खूप काही शिकवतात. आणि अशा प्रकारे आपण एक चांगले व्यक्ती बनतो, परंतु कधीकधी असे देखील होते की
आपल्याला लहान चुकांसाठी मोठी भरपाई मोजावी लागते. विशेषत: जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा छोटा निष्काळजीपणा तुमच्यासाठी मोठी समस्या
बनू शकतो. (Health Tips)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मात्र, महिलांचा विचार केला तर, महिला कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतात, पण जेव्हा स्वत:च्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या त्याकडे दुर्लक्ष
करतात. कदाचित यामुळेच महिलांना कमी वयात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत, आम्ही तुम्हाला अशा काही
चूकांबद्दल सांगणार आहोत ज्या करणे टाळावे.

महिलांनी टाळाव्यात या चूका

1. साखरेऐवजी शुगर फ्री (Sugar free instead of sugar) –
काही महिला स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी साखरेऐवजी शुगर फ्री चे सेवन करतात, त्यांना असे वाटते की त्या निरोगी राहतील. पण ते योग्य नाही. जास्त प्रमाणात शुगर फ्री घेतल्याने तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही गूळ (Jaggery) किंवा मधाचे (Honey) सेवन करावे.

 

2. जेवण वगळणे (Skipping meals) –
बहुतेक महिला ही चूक करतात. काही स्त्रिया जेव्हा वेट लॉस प्रोसेसमध्ये असतात तेव्हा त्या कॅलरी काऊंट मॅनेज करण्यासाठी जेवण वगळतात. त्या सहसा रात्रीचे जेवण घेत नाही. असे केल्याने तुमची चयापचय क्रिया मंदावते. एवढेच नव्हे तर तुमचे कमी झालेले वजनही झपाट्याने वाढू लागते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. भात आहारातून वगळणे (Excluding rice from diet) –
काही महिलांना वाटते की, भातामुळे चरबी वाढते आणि त्यामुळे त्या आहारातून भात वगळतात.
पण तसे नाही. भात दिवसभरात, मर्यादित प्रमाणात खावा.
यासाठी तुम्ही हवे असल्यास भातामध्ये थोड्या फायबरचा देखील समावेश करू शकता.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Health Tips    #Health     #lifestyle    #Honey     #jaggery     

 

Web Title :- Health Tips | health tips health mistakes women health and sugar free instead of sugar skip miles

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | मद्यापान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईसह परवाना रद्द, नंदुरबार पोलिसांची विशेष मोहीम

Nandurbar Police | बँकेतून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून लुटणारे दोन परप्रांतीय नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात, लुटलेली 1 लाखांची रक्कम जप्त

 

Related Posts