IMPIMP

Hengameh Ghaziani | हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर प्रसिद्ध इराणी अभिनेत्रीला अटक, व्हिडीओ व्हायरल

by nagesh
Hengameh Ghaziani | iranian actor hengameh ghaziani arrested after removed hijab in instagram video post

सरकारसत्ता ऑनलाईन  – Hengameh Ghaziani | सध्या इराणमध्ये पोलिसांच्या मारहाणीत महसा अमिनीच्या (Mahsa Amini) मृत्यूनंतर पेटलेले हिजाब विरोधी आंदोलन अजूनही चालू आहे. आता इराणमधील प्रसिद्ध अभिनेत्री हेंगामेह गाझियानीला पोलिसांनी अटक (Iranian Actor Hengameh Ghaziani Arrested) केले आहे. सार्वजनिक रित्या हिजाब हटवून व्हिडिओ (Removed Hijab) पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासह विरोधी माध्यमांशी संवाद साधल्यानं गाझियानीवर ही कारवाई करण्यात आली होती, असे वृत्त ‘आयआरएनए’ या वृत्त संस्थेनं दिलं आहे. (Hengameh Ghaziani)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

52 वर्षीय गाझियानीने शनिवारी इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “ही माझी शेवटची पोस्ट ठरू शकते”. पोस्ट करण्यापूर्वी पोलिसांनी तिला समन्स बजावला होता मात्र या अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट केला आणि सोबतच म्हटले की, “या क्षणापासून माझ्यासोबत जे काही घडेल ते नेहमीप्रमाणे जाणून घ्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इराणी जनतेच्या सोबत असेल”. (Hengameh Ghaziani)

 

https://www.instagram.com/reel/ClJ3cY7AYss/?utm_source=ig_embed&ig_rid=0fb0356c-440d-4726-b943-4a1b0465736f

 

या व्हिडिओत आपण पाहू शकतो इराणमधील एका बाजारात हिजाब शिवाय व्हिडिओ गाझियानीने काढला आहे. यामध्ये ती मोकळे केस बांधताना दिसत आहे.एवढेच नाही तर गेल्या आठवड्यातच तिने एका पोस्टमध्ये इराणी सरकारला ‘चाइल्ड किलर’ असे देखील म्हटले होते. यामध्ये तिने इराणी सरकारने पन्नास हुन अधिक लहान मुलांचा खून केल्याचा आरोप केला होता.

 

याआधी देखील हिजाब (Hijab) शिवाय सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याप्रकरणी तरानेह अलिदुस्ती
(Taraneh Alidoosti) या इराणी अभिनेत्रीला अटक करण्यात आले होते.
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिजाबला विरोध केला जात आहे.
पोलिसांनी फक्त हिजाब नीट परिधान केला नाही या कारणाने महसा अमिनीला (Mahsa Amini) अटक केले होते.
त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असताना तिला मारहाण करण्यात आले आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Hengameh Ghaziani | iranian actor hengameh ghaziani arrested after removed hijab in instagram video post

 

हे देखील वाचा :

Pune News | विद्यार्थी साहाय्यक समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव दत्तात्रय उर्फ एन. डी. पाटील यांचे निधन

Nitesh Rane | ‘सावरकरांवर टिका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा…” नितेश राणेंकडून संजय राऊतांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत शिवसेनेवर पलटवार

Ajit Pawar | डॉक्टर शनिवारी रजेवरच असतात, बारामतीकरांच्या तक्रारीनंतर अजित पवारांची सरप्राईज व्हिजीट; डॉक्टर आला ‘गोत्यात’

 

Related Posts