IMPIMP

IMD Forecast | भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात

by nagesh
Pune Crime | girl death lightning ambegaon pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  IMD Forecast | मागील काही दिवसापासून राज्यासह देशात अनेक भागात पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली होती, यामुळे अनेक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला होता. मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात पुरस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र, पावसाला धीमी गती आल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला (IMD Forecast) सुरूवात केली आहे. आज (बुधवारी) राजस्थान आणि गुजरातच्या (Rajasthan and Gujarat) काही भागातून मॉन्सून परतला आहे. उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

जुलै महिन्यात पावसाने देशभर हजेरी लावली होती. त्यानंतर पुर्ण भारतात पाऊसानं तडाखा दिला आहे.
या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाने राज्यतील अनेक भागात नुकसान देखील झालं.
दरम्यान, साधारण अडीच महिन्यानंतर आता पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
तसेच पावसाच्या परतीच्या सुरुवातीची तारीख 17 सप्टेंबर 2021 निश्चित केली असल्याचं समजते.
यावेळी जवळपास 19 दिवस लेट पाऊस माघारी परतु लागला आहे.
असं हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं (IMD Forecast) आहे.

आज 6 ऑक्टोबर रोजी पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतला. त्याचबरोबर बिकानेर, जाेधपूर, जालाेर आणि भूजपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतलीय.
यामुळे भारतातील अनेक काही भागातून पाऊस जाण्याची शक्यता आहे. तसं पोषक वातावरणही निर्माण झालं आहे.
दरम्यान, आगामी तीन ते चार दिवसामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणाहून पाऊस माघारी घेण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

 

Web Title : IMD Forecast | return journey monsoon rain india

 

हे देखील वाचा :

ZP, Panchayat Samiti Election | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ‘धक्का’ ! नगरखेडा पंचायत समितीत भाजपचं ‘कमळ’ फुललं

Palghar ZP Election Result | पालघरमध्ये शिवसेनेला धक्का ! खासदाराच्या मुलाला पराजित करत भाजपची ‘बाजी’

LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

 

Related Posts