IMPIMP

Income Tax Slab | आयकर भरण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख; उशीर झाल्यास करदात्यावर खटला? जाणून घ्या

by nagesh
ITR | common itr form for all taxpayers income tax updates news new itr rules

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Income Tax Slab | करदात्यांना आयकर विभागाकडून (Income Tax Department) एक दिलासा देण्यात आला आहे. 2021-2022 वर्षासाठी आयकर परतावा (Returns) अथवा आयटीआर (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 रोजी होती. परंतु, आता मुदत वाढवण्यात आली आहे. रिटर्न (ITR) भरण्याची सुविधा आता 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. महत्वाचे म्हणजे हे देय मुदतीच्या तारखेपर्यंत जमा केले नाही तर सरकार तुमच्यावर कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Income Tax Slab)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्या करदात्यांनी 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरला नाही. त्यांच्या कर स्लॅबनुसार (Income Tax Slab) दंड भरून ITR पूर्ण करू शकणार आहेत. आयटीआर 31 मार्चपर्यंत भरला नाही तर कर भरावा लागल्यानंतर किमान तीन वर्षे आणि अधिकाधिक सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशा करदात्यांकडून आयकर विभाग थकित कर आणि व्याजाशिवाय 50 ते 200 टक्के दंडही लावू शकतो. सरकारची इच्छा असेल तर ते करदात्यावर खटला देखील चालवू शकतात.

 

दरम्यान, प्राप्तिकर नियमांनुसार, ITR दाखल करण्यात अपयशी ठरणाऱ्या प्रत्येक करदात्यावर सरकार कारवाई करत नाही.
जेव्हा कर दायित्व 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तेव्हाच आयकर विभाग खटल्यांची कार्यवाही सुरू करतो.
जर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर करदात्याला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकणार आहे.
परंतु, जर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडाची रक्कम 1 हजार रुपये असणार आहे.

 

Web Title :- Income Tax Slab | income tax department may start legal proceeding if not file your return till 31 march

 

हे देखील वाचा :

LIC IPO | एलआयसीच्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती मिळणार लाभ? सगळ्यात आधी करा ‘हे’ काम पूर्ण

Maharashtra NCC | कौतुकास्पद! महाराष्ट्र एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा ‘प्रधानमंत्री बॅनर’

APY | खुशखबर ! मोदी सरकार दरमहिना देईल 5000 रुपये, वार्षिक होईल पूर्ण 60,000 ची कमाई, जाणून घ्या कशी?

 

Related Posts