IMPIMP

APY | खुशखबर ! मोदी सरकार दरमहिना देईल 5000 रुपये, वार्षिक होईल पूर्ण 60,000 ची कमाई, जाणून घ्या कशी?

by nagesh
Atal Pension Yojana-APY | atal pension yojana is best retirement investment plan will get rs 5000 pension per month know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाAPY | केंद्र सरकारकडून अनेक विशेष योजना (Central Government scheme) राबवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला दरमहा 5000 रुपये देते. हे पैसे तुमचे म्हातारपण सुरक्षित करेल. सरकार तुम्हाला अनेक योजनांद्वारे आर्थिक मदत करते. (APY)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) असे या सरकारी योजनेचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला निश्चित पेन्शन दिली जाते. यामध्ये सरकार दर महिन्याला नागरिकांना 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतची रक्कम देते.

 

18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक, विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणारा, या योजनेत गुंतवणूक करून पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे चालविली जाते.

 

या योजनेत नागरिकांना दरमहा प्रीमियमची रक्कम भरावी लागते. अर्जदार 18 वर्षांचा असल्यास, त्याला दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. याशिवाय दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी फक्त 42 रुपये द्यावे लागतील.

 

जर कोणत्याही कारणास्तव नागरिकाचा वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर या अटल पेन्शन योजनेचे पैसे त्या नागरिकाच्या नामनिर्देशित व्यक्तीला दिले जातील. (APY)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अटल पेन्शन योजनेत तुमचे खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जावे लागेल आणि APY नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
यासोबतच आधार आणि मोबाईल क्रमांकही द्यावा लागणार आहे. यानंतर, त्याच बँक खात्यातून दर महिन्याला तुमचा हप्ता आपोआप कापला जाईल.

 

तुम्ही यामध्ये मासिक, त्रैमासिक आणि सहामाही गुंतवणूक करू शकता. तुम्हाला वयाच्या 42 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल,
त्यानंतर 42 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 1.04 लाख रुपये होईल आणि 60 वर्षांनंतर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल.

 

या योजनेत एका सदस्याच्या नावाने एकच खाते उघडले जाईल. हे प्राप्तीकर कलम 80 CCD अंतर्गत यामध्ये कर सवलतीचा लाभ मिळतो.
पहिल्या 5 वर्षांसाठी योगदानाची रक्कमही सरकार देईल.

 

Web Title :- APY | atal pension scheme get 5k rupees every month atal pension yojana benefits central government scheme

 

हे देखील वाचा :

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांनी खाऊ नये मध? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांकडून IAS अधिकारी सुशील खोडवेकरला अटक; शिक्षक भरती घोटाळयातील सहभाग समोर आल्यानं कारवाई

Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

 

Related Posts