IMPIMP

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला

by nagesh
Indrani Balan Foundation | The first 'Indrani Balan Winter T20 League' cricket tournament; The game changers celebrated the opening day

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत द गेमचेंजर्स संघाने सलग दोन विजय मिळवत स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. मुंढवा (Mundhwa) येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात अद्वय सिधये याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ‘द गेमचेंजर्स इलेव्हन’ने (the game changers eleven) पुणे सी. ए. क्लबचा १४९ धावांनी पराभव करून दकण्यात सुरूवात (Indrani Balan Foundation) केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पहिल्यांदा फलंदाजी करताना द गेमचेंजर्स इलेव्हनने २० षटकामध्ये २२७ धावांचा डोंगर उभा केला. आदिल अन्सारी (७६ धावा), अद्वय सिधये (६५ धावा), सुरज शिंदे (३८) आणि मिझान सय्यद (२३) यांनी संघाला मजबूत धावसंख्या उभी करून दिली. आदिल आणि अद्वय यांनी दुसर्‍या गड्यासाठी ८५ चेंडूत १५० धावांची भागिदारी केली. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी अद्वय आणि सुरज यांनी २४ चेंडूत ६६ धावांची भागिदारी करून सव्वादोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाला प्रतिउत्तर देताना पुणे सी.ए. क्लबचा डाव १२.३ षटकात ९ गडी गमावून ७८ धावा गुंडाळला गेला. गेमचेंजर्सच्या सिध्देश वारघंटे (३-२१) आणि अद्वय सिधये (२-६) यांनी चमकदार गोलंदाजी (Indrani Balan Foundation) केली.

 

 

दुसर्‍या सामन्यात नौशाद शेख याच्या कामगिरीच्या जोरावर द गेमचेंजर्स इलेव्हनने वैंकिज् इलेव्हन संघाचा ४७ धावांनी पराभव करून सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. गेमचेंजर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९० धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये आदिल अन्सारी याने ४५ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांसह ७० धावांची खेळी साकारली. यासह देवदत्त नातु (४३ धावा), नौशाद शेख (२४ धावा) आणि दिव्यांग हिंगणेकर (२१ धावा) यांनी दुसर्‍या बाजूने साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना वैंकिज् इलेव्हन संघाने २० षटकात ९ गडी गमावून १४३ धावा जमविल्या. सुजित उबाळे (३५ धावा), अमित सिंग (३५) आणि सागर बिरडावडे (२९) यांच्या खेळी संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. नौशाद शेख याने २० धावात ४ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

स्पर्धेचे उद्घाटन इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल आणि बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी यांनी तर, सुत्रसंचालन अभय जाजू यांनी केले.
यावेळी स्पोर्ट्सफील्डचे संतोष शहा, अक्षय जाधव, आनंद ओझा आणि अमित काळे उपस्थित होते.

 

सामन्यांचा सविस्तर निकालः

१) द गेमचेंजर्स इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद २२७ धावा (आदिल अन्सारी ७६ (४४, ६ चौकार, ४ षटकार),
अद्वय अन्सारी ६५ (४५, ६ चौकार), सुरज शिंदे ३८, मिझान सय्यद २३, विवेक बाज ३-२४) वि.वि. पुणे सी.ए. क्लबः १२.३ षटकात ९ गडी बाद ७८ धावा
(सौरभ सोनी ३२, सिध्देश वारघंटे ३-२१, अद्वय सिधये २-६); सामनावीरः अद्वय सिधये;

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

२) द गेमचेंजर्स इलेव्हनः २० षटकात ४ गडी बाद १९० धावा (आदिल अन्सारी ७० (४५, ५ चौकार, ४ षटकार), देवदत्त नातु ४३ (३४, ७ चौकार),
नौशाद शेख २४, दिव्यांग हिंगणेकर २१, मयुर टिंगरे ३-२८);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी आदिल आणि देव यांच्यात ९५ (६८)
वि.वि. वैंकिज् इलेव्हनः २० षटकात ९ गडी बाद १४३ धावा (सुजित उबाळे ३५, अमित सिंग ३५, सागर बिरडावडे २९,
नौशाद शेख ४-२०, प्रज्वल गौंड ३-३७); सामनावीरः नौशाद शेख;

 

Web Title :- Indrani Balan Foundation | The first ‘Indrani Balan Winter T20 League’ cricket tournament; The game changers celebrated the opening day

 

हे देखील वाचा :

Sovereign Gold Bond | पुढील 5 दिवसांपर्यंत ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या दर

Pune Navale Bridge | नवले पूलाची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका उचलणार ‘हे’ पाऊल, महापौरांनी दिले आदेश

MSRTC | ऐन दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ !

 

Related Posts