IMPIMP

Intestine Cure | शरीरातून लागोपाठ मिळणारे ‘हे’ संकेत सांगतात तुमच्या आतड्यांची स्थिती, जाणून घ्या याबाबत

by nagesh
Intestine Cure | intestine cure these body signals tell the condition of your intestines know about them

सरकारसत्ता ऑनलाइन – Intestine Cure | जर तुम्हाला वारंवार पचनाशी संबंधित समस्यांना (Digestion Problems) सामोरे जावे लागत असेल, थकवा, वजनही वाढत असेल तर ते सामान्य नाही. हे चिन्ह आतडे कमकुवत होण्याचे थेट संकेत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज आपण आतडे कमकुवत होण्याची लक्षणे (Symptoms Of Intestinal Weakness) जाणून घेणार आहोत, तसेच त्यांना बळकट करण्याच्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत (Intestine Cure).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वजन कमी-जास्त होणे (Weight Loss-Gain)

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल किंवा कमी करायचे असेल, पण तसे करता येत नसेल, तर ते आतडे कमकुवत होण्याचे लक्षण आहे. जितक्या लवकर तुम्ही याकडे लक्ष द्याल तितके चांगले होईल, अन्यथा इतर अनेक प्रकारच्या समस्या सुरू होऊ शकतात (Intestine Cure).

 

थकवा जाणवणे (Feeling Tired)

पुरेशी झोप घेऊनही आणि सकस आहार घेतल्यावरही जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, तर ते आतडे व्यवस्थित काम करत नसल्याचे लक्षण आहे. क्रॉनिक थकवा सिंड्रोम (Chronic Fatigue Syndrome) असलेल्या व्यक्तींमध्ये मायक्रोबायोममधील संतुलन बिघडू शकते. थकल्यासारखे, कमकुवत वाटणारे लोक इरिटेबल बाऊल सिंड्रोमने ग्रस्त होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो.

 

त्वचेची जळजळ (Skin Inflammation)

एक्जिमा, सोरायसिस आणि मुरुमांची समस्या देखील कमकुवत आतड्यांचे लक्षण आहे. आतडे मायक्रोबायोम कॉम्प्लेक्स इम्युनिटी सिस्टमद्वारे (Microbiome Complex Immunity System) त्वचेवर परिणाम करते. इतकेच नाही तर त्वचेची अ‍ॅलर्जी, फूड अ‍ॅलर्जी आणि रेस्पीरेटरी अ‍ॅलर्जीही (Skin Allergy, Food Allergy And Respiratory Allergy) याच कारणामुळे होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आतडे अशा प्रकारे करा मजबूत (Make The Intestines Stronger In This Way)

 प्रथम आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 आवश्यक फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
 फास्ट, जंक फूडपासून दूर राहा.
 तणाव आणि चिंतांपासून शक्य तितके दूर राहा. यासाठी तुम्ही मेडिटेशनची मदत घेऊ शकता.
 प्रौढ व्यक्तीसाठी 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची असते, त्याचे महत्त्व समजून घ्या.
 कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करू नका.
 जास्तीतजास्त फायबर युक्त आहार घ्या.
 खाल्ल्यानंतर थोडा वेळ फिरायला जा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Intestine Cure | intestine cure these body signals tell the condition of your intestines know about them

 

हे देखील वाचा :

Pune Crime | Tinder App वर ओळख ! मुंबईत ‘ताज’ मध्ये नेऊन 23 वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात राजेश सायनीविरूध्द गुन्हा

Dhule Crime | धुळ्यामध्ये सापडल्या तब्बल 89 तलवारी तर एक खंजीर, महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट ?, भाजपचा गंभीर आरोप !

Stress Relief Tips | सतत तणावात राहता का, मग ‘या’ 6 टिप्स फॉलो करून दूर करा स्ट्रेस आणि रहा आनंदी; जाणून घ्या

 

Related Posts