IMPIMP

IPL 2022 | आयपीएलच्या मॅचेस मुंबई-पुण्यात होणार का? सौरव गांगुली म्हणाला…

by nagesh
IPL 2023 | ipl 2023 bcci introduces new rule for new season impact player rule know wht

सरकारसत्ता ऑनलाइन – IPL 2022 | मागील कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर गतवर्षीचे आयपीएल सामने भारताबाहेर खेळवण्यात आले. दरम्यान यंदा 15 व्या हंगामाची तयारी (Indian Premier League 2022) जोरदार सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) IPL च्या नियोजनाचे व्यवस्थित प्रयत्न करीत आहे. दरम्यान, यंदाचा हंगाम भारतात जरी होणार असेल तर महाराष्ट्रात होणार का? याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) महत्वाची माहिती दिली आहे. (IPL 2022)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बीसीसीआयने अहमदाबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स या 2 नवीन टीमची भर घातली आहे. त्यामुळे ही स्पर्धा नेहमीपेक्षा आणखी रोमांचक होण्याची शक्यता असणार आहे. तर, ”आम्हाला आयपीएल 2022 पूर्णपणे भारतात आयोजित करायचे आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिली, तर ही लीग भारतातच आयोजित करण्यात येणार असल्याचं,” सौरव गांगुली यांनी सांगितलं आहे. (IPL 2022)

”कोरोनाची प्रकरणे फार वाढत नाहीत, तोपर्यंत आयपीएल भारतात आयोजित केले जाईल. सामना आयोजनाच्या ठिकाणांबद्दल बोलायचं झालं, तर आम्हाला सामने महाराष्ट्रातच आयोजित करायचे आहेत. लीगचे सामने फक्त मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) खेळविले जातील. बाद फेरीसाठी सामन्यांचे ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.” अशी माहिती देखील सौरव गांगुली यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा लीगचे सामने मुंबई आणि पुण्यातच होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- IPL 2022 | bcci looking hosting league matches in mumbai and pune says sourav ganguly

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी 3 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Dr. Sumit Saha | समाजामध्ये कर्करोगाची जागरूकता होणे काळाजी गरज – डॉ. सुमित शहा

Nawab Malik | वानखेडे यांच्या अवमान याचिका प्रकरणात नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

 

Related Posts