IMPIMP

Nawab Malik | वानखेडे यांच्या अवमान याचिका प्रकरणात नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

by nagesh
Nawab Malik | bombay high court seeks nawab maliks reply to contempt plea by sameer wankhedes father Dnyandev Wankhede

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनएनसीबीचे (NCB) माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Former Divisional Officer Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद सर्वांनी पाहिला आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) अवमान याचिका दाखल (Contempt Petition Filed) केली होती. त्यासंदर्भात आता नवाब मलिक यांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

न्या. एस. जे. काथावाला (Justice. S. J. Kathawala) व न्या. मिलिंद जाधव (Justice. Milind Jadhav) यांच्या खंडपीठासमोर (Bench) गुरुवारी या अवमान याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी उच्च न्यायालयात वानखेडे कुटुंबीयांविरोधात बदनामीकारक वक्तव्य न करण्याची हमी देऊनही मलिक त्यात सवलत का घेत आहेत ? असा सवाल उपस्थित करत मंत्रीच जर आशा प्रकारे सवलत घेत असतील तर न्यायालय ती मागे घेईल असा इशाराही नवाब मलिक (Nawab Malik) यांना खंडपीठाने दिला.

 

गेल्या महिन्यात नवाब मलिक यांच्या विरोधात उच्च न्यायालयात ज्ञानदेव वानखेडे यांनी अवमान याचिका दाखल केली होती.
त्यावर खंडपीठासमोर सुनावणी झाली.
त्यामध्ये मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची हमी न्यायालयाला दिली होती.
ती हमी देत असताना सरकारी अधिकारी (समीर वानखेडे यांच्यासह) कर्तव्य बजावत असताना त्यांच्याबाबत वक्तव्ये करण्यापासून आपल्याला मनाई करू नये,
अशीही विनंती मलिक यांनी न्यायालयाला केली होती.

 

दरम्यान, मलिक यांनी न्यायालयाला दिलेल्या हमीचा भंग करत 2 आणि 3 जानेवारीला आक्षेपार्ह विधाने केले.
असे अवमान याचिकेत ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हंटले आहे.
वानखेडे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ (Senior lawyer Birendra Saraf) यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून
(Caste Certificate) व क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drugs Case) मलिक यांनी विधाने केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तर त्यावर युक्तिवाद करताना मलिक यांचे वकील रामेश दुबे (Lawyer Ramesh Dubey) यांनी मलिकांनी न्यायालयाकडून मागितलेल्या सवलतीच्या मर्यादेतच ही विधाने येतात.
हे मंत्र्यांना सांगायचे आहे असे सांगितले.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मलिक यांना प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे निर्देश दिले तसेच ही सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nawab Malik | bombay high court seeks nawab maliks reply to contempt plea by sameer wankhedes father Dnyandev Wankhede

 

हे देखील वाचा :

RBI Fraud Alert | डिजिटल ट्रांजक्शन करताना राहा सावध, रिझर्व्ह बँकेने दिला इशारा – तुमच्या कमाईवर सायबर गुन्हेगारांचा ‘वॉच’

WHO Global Center | जगभरात होणार आयुर्वेदाची वाहवा, अर्थसंकल्पात तरतूद; आता भारतात उभारणार पहिले WHO-ग्लोबल सेंटर

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 2 हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर FIR; कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ

 

Related Posts