IMPIMP

Jal Jeevan Mission Maharashtra | जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

by nagesh
Jal Jeevan Mission Maharashtra | Organize a Gram Sabha for inclusion of Padas in Jaljeevan Mission - Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन  – Jal Jeevan Mission Maharashtra | जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावे, घरांसाठी शाश्वत स्वरूपाची पाणी योजना निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकही पाडा, गाव, घर वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी दिल्या आहेत. (Jal Jeevan Mission Maharashtra)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील जलजीवन मिशन आणि घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित (Dr. Supriya Gavit), खासदार डॉ. हिना गावित (MP Dr. Heena Gavit), जिल्हाधिकारी मनिषा खत्री (Manisha khatri), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (Raghunath Gawade), उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले (Jayant Ugale), नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह (Pulkit Singh) तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. (Jal Jeevan Mission Maharashtra)

 

काटेकोर सर्वेक्षण करण्यात यावे

यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशन आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नये. तसेच लोकांच्या तक्रारी कमी होण्यासाठी 15 दिवसाच्या आत ग्रामसभेतून सर्वेक्षणाचे पुनर्विलोकन करून सर्वेक्षण अधिक काटेकोर करून घ्यावे. यात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करावी. धडगाव, अक्कलकुवा, शहादा या तालुक्यातून त्रुटींबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा करून सर्वसमावेशक गावांचा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात यावा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

100 टक्के घरांचा समावेश करावा

जलजीवन मिशनच्या माध्यमातून गाव, पाडा, मनुष्यनिहाय नियोजन करण्याची ही आगळी-वेगळी योजना
असून येणाऱ्या 30 वर्षांसाठी पेयजलाची ही शाश्वत स्वरूपाची योजना आहे.
त्यामुळे गावातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे.
त्यामुळे लोकांना वेळेत पेयजल मिळण्यासाठी वेळेत योजना पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

 

 

Web Title :- Jal Jeevan Mission Maharashtra | Organize a Gram Sabha for inclusion of Padas in Jaljeevan Mission – Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘एकनाथ शिंदे 2014 सालीच बंड करणार होते, उद्धव ठाकरेंचा कॉल आला अन्…’

Pune Crime News | चतुःश्रृंगी परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईतावर MPDA कायद्यान्वये कारवाई, पोलिस आयुक्तांची 9 वी कारवाई

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 

Related Posts