IMPIMP

Pune Crime News | चतुःश्रृंगी परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईतावर MPDA कायद्यान्वये कारवाई, पोलिस आयुक्तांची 9 वी कारवाई

by nagesh
Pune Crime News | Action under MPDA Act against innkeeper who created terror in Chathushringi area, 9th action of Police Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत गुन्हे करणारा अट्टल
गुन्हेगार रणजीत रघुनाथ रामगुडे (20, रा. सर्व्हे नं. 127, सुतारवाडी, पाषाण) याच्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी
एमपीडीए कायद्यान्वये Maharashtra Prevention Of Dangerous Activities Act (MPDA Act) कारवाई केली असून त्यास कोल्हापूर मध्यवर्ती
कारागृहात (Kalamba Central Jail – Kolhapur) वर्षभराकरिता स्थानबध्द करण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रणजीत रामगुडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीत धारदार हत्याराने खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयासह दंगा, बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे, दुखापत करणे आणि वाहनांची तोडफोड करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्यापासून धोका असल्याने नागरिक त्याच्याविरूध्द उघडपणे तक्रार करत नव्हते. (Pune Crime News)

 

त्यास स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI Balaji Pandhare), पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) आणि पीसीबीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेखा वाघमारे (Sr PI Surekha Waghmare) यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. पोलिस आयुक्तांनी त्यास वर्षभरासाठी स्थानबध्द करून
त्याची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 9 वी एमपीडए कायद्यान्वये केलेली कारवाई आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Action under MPDA Act against innkeeper who created terror in Chathushringi area, 9th action of Police Commissioner

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री करु’, ‘या’ नेत्याची अजित पवारांना थेट ऑफर

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Pune Collector Dr. Rajesh Deshmukh Marathi | मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

Related Posts