IMPIMP

Jalna ACB Trap | माजी सैनिकाकडून नोझल मशीनच्या स्टॅम्पिंगसाठी लाच मागणारा अधिकारी अटकेत, जालन्यातील घटना

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन – माजी सैनिकाकडून त्यांना मिळालेल्या पेट्रोल पंपासाठी नोझल मशीनचे स्टॅम्पिंग करुन देण्यासाठी निरीक्षकाने 8 हजार रुपयांची लाच मागितल्याचा (Jalna ACB Trap) प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला पेट्रोलपंप मालक माजी सैनिकाने तक्रार दिली होती. विभागाने सापळा रचत लाचखोर निरीक्षकाला (Jalna ACB Trap) लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

 

तक्रारदार माजी सैनिक मानवत येथील रहिवासी असून, त्यांना माजी सैनिक कोटयातून पेट्रोलपंप मिळाला आहे. त्यांचा पेट्रोलपंप सातोना खुर्द ता. परतूर जि. जालना येथे फौजी पेट्रोलीयम नावाने आहे. त्यांच्या पेट्रोल पंपावर एमपीडी मशीनचे 2 नोझल स्टॅम्पिंग करून देण्यासाठी त्यांनी वैद्यमापन शास्त्र विभागास अर्ज केला होता. पण यावेळी तेथील निरीक्षक आरोपी प्रदिप विष्णूकांत येंडे (वय- 43, रा. भाग्योद्य नगर, सातारा परिसर) यांनी 8 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रथिबंधक विभागाला करण्यात आली. आरोपी लोकसेवक येंडे यांनी स्टॅम्पिंगसाठी स्वताला 5 हजार रुपये, सोबत आलेले शिपाई कोलते याच्यासाठी 2 हजार रुपये आणि जनरल एनर्जी मँनेजमेंट सिस्टीम या कंपनीचा ऑपरेटर फुलचंद जाधव याच्यासाठी 1 हजार रुपये असे एकूण 8 हजार रुपये लाचेची मागणी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानुसार विभागाने सापळा रचत सेलू – परतूर मार्गावरील हॉटेल शेतकरी येथे लाच स्वीकारताना येंडे याला पंचासमोर रंगेहात पकडले. आरोपी लोकसेवकावर लाचेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा पर्यवेक्षण व सापळा अधिकारी उपअधिक्षक सुदाम पाचोरकर, पोलिस निरिक्षक शंकर म. मुटेकर,
पोलिस अंमलदार गजानन घायवट, गणेश बुजाडे, प्रविण खंदारे, गजानन कांबळे यांनी केली.

 

Web Title :- Jalna ACB Trap | Officer arrested for demanding bribe from ex-soldier for stamping nozzle machine, incident in Jalana

 

हे देखील वाचा :

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Rakhi Sawant | राखी सावंतने टॉयलेटमधील व्हिडीओ केला शेअर

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी

Sanjay Raut On Raosaheb Danve | ‘केंद्रीय मंत्री असल्याने माहिती त्यांच्यापर्यंत गेली असावी’; संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना टोला

 

Related Posts