IMPIMP

Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

by nagesh
Jammu And Kashmir Encounter | 3 terrorists killed encounter security forces jks budgam jammu kashmir

श्रीनगर : वृत्तसंस्था Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील जोलवा भागात गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी (Security Force) शोध आणि घेरा बंदी मोहीम राबवली होती. त्यावेळी दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान (Enocunter) घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दरम्यान, आयजीपी काश्मीर यांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळ्यांसह अनेक आपत्तिजनक साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Jammu And Kashmir Encounter)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

https://twitter.com/ANI/status/1479332221794226176?s=20

 

बुधवारी पुलवामामध्ये चकमक –

पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम राबवली. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे हे तिघे सदस्य होते.त्यातील एक जण पाकिस्तानी नागरिक होता. यावेळीही शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी चांदगाममध्ये शोध मोहीम राबवली. ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते त्या ठिकाणाला घेराव घालत दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यामुळे, प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार (Firing) केला. त्यात तिघांचाही खात्मा झाला अशी माहिती काश्मीर पोलिसांनी (Kashmir Police) दिली आहे. (Jammu And Kashmir Encounter)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस महानिरीक्षक विजय कुमार (IG Vijay Kumar) म्हणाले की, ‘गेल्या पाच दिवसातील ही पाचवी कारवाई आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यातील एक पाकिस्तानी नागरिक असून त्यांच्याकडून दोन एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-47 रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवानांनी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, असेही त्यांनी सांगितले.

 

 

Web Title : Jammu And Kashmir Encounter | 3 terrorists killed encounter security forces jks budgam jammu kashmir

 

हे देखील वाचा :

NEET-PG OBC Reservations | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; EWS 10 टक्के आरक्षणालाही ग्रीन सिग्नल

Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

 

Related Posts