IMPIMP

NEET-PG OBC Reservations | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; EWS 10 टक्के आरक्षणालाही ग्रीन सिग्नल

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NEET-PG OBC Reservations | वैद्यकीय कोट्यातील इतर मागासवर्गीय वर्ग म्हणजेच ओबीसींच्या आरक्षणाबाबत (OBC Reservations) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना 10 टक्के आरक्षण (EWS Reservation) लागू करण्याविरोधातील याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला आहे. वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला आता सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) 10 टक्के आरक्षणाला देखील न्यायालयांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. (NEET-PG OBC Reservations)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्यावरुन राज्यात गदारोळ उडाला आहे. नुकतंच याबाबत न्यायालयाकडून (Supreme Court) स्थगिती देण्यात आल्याने ओबीसी समाजात नाराजी पसरली. दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अजुन न्यायालयातच आहे. यानंतर आज (शुक्रवारी) वैद्यकीय कोट्यातील OBC आरक्षणाबाबत निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, आज न्यायालयाने हे आरक्षण मान्य करत तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. (NEET-PG OBC Reservations)

 

आर्थिक आरक्षणासाठी क्रिमी लेयर की ओबीसींप्रमाणे 8 लाख रुपये नसावी, ती कमी करण्यात यावी, अडीच लाख रुपये इतकीच ठेवावी असा युक्तिवाद यावेळी विरोधी बाजूच्या वकिलांनी आज केला होता. न्यायालयाने सांगितल्यानंतर केंद्र सरकारने याचा फेरआढावा घेण्यासाठी एक समितीही नेमली होती. या समितीनं वरकरणी ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 8 लाख रुपये मर्यादा एकसारखी वाटत असली तरी आर्थिक दुर्बल घटकासाठीचे मोजणीचे निकष हे वेगळे आणि अधिक कडक असल्याचं सांगितलं होतं. हाच निष्कर्ष बाबत काय होणार?  याबाबत मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : NEET PG OBC Reservations | supreme court allows NEET PG medical counselling with OBC EWS quotas

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

National Pension Scheme | सरकारच्या ‘या’ पेन्शन पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर जमा होतील कोटी रुपये; दरमहिना 27,000 च्या जवळपास येईल रक्कम

 

Related Posts