IMPIMP

Jiddari Marathi Movie | उत्कट प्रेमकथा असलेला ‘जिद्दारी’ शिवजयंती च्या पूर्वसंध्येला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

'जिद्दारी' मध्ये दिसणार प्रेमकथा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महीला सबलीकरण असा त्रिवेणी संगम

by nagesh
Jiddari Marathi Movie | Jiddari with a passionate love story is coming to the audience on the eve of shivjayanti 2022

सरकारसत्ता ऑनलाइन – Jiddari Marathi Movie | शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेती पिकली, शेतकरी जगाला तरच जगरहाट सुरू राहणार
हे वास्तव आहे. मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य, ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण
आणि एक उत्कट प्रेमकथा यांचा त्रिवेणी संगम असलेला जिद्दारी’ हा मराठी चित्रपट (Jiddari Marathi Movie) येत्या ‘शिवजयंती’च्या (shivjayanti
2022) पूर्वसंध्येला म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अमोल आबासाहेब शिंदे होळकर (Amol Abasaheb Shinde Hoalkar) म्हणाले, ‘जिद्दारी’ म्हणजे जिद्द. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत असला तरी त्यामध्ये महिला सबलीकरण आणि एक सुंदर अशी प्रेमकथा सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात विदुला बाविस्कर (Vidula Baviskar), शुभम तारे (Shubham Tare), विजय अंजान (Vijayraj Anjan), रवींद्र सोळंके (Ravindra Solnke), रवींद्र ढगे (Ravindra Dhage), सुधीर माले (Sudhir Male), राजश्री पठारे ( Rajshree Pathare), जयश्री सोनवणे (Jayashree Sonawane) यांच्या भूमिका आहेत.

 

 

ए. आर. माइंडस प्रॉडक्शन (A. R. Minds Production) प्रस्तुत ‘जिद्दारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती दीप्ती जाधव शेंदारकर ( Deepti Jadhav Shendarkar) यांची आहे. संगीत दिग्दर्शक देव – सुचिर यांनी सुहास मुंडे, निखिल राजवर्धन यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे तर ‘जिद्दारी’ मधील गीते आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, सोनिया उपाध्याय, अतुल जोशी, राजलक्ष्मी शेंदारकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत. (Jiddari Marathi Movie )

 

 

‘जिद्दारी’च्या निर्मात्या दीप्ती जाधव शेंदारकर म्हणाल्या, आमचा चित्रपट महिला, शेतकरी यांचे एक वेगळे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये मराठवाड्याची पार्श्वभूमी दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अभिजीत कांबळे आहेत, संकलन अमोल निंबाळकर, पूजा पाटील यांनी केले आहे, तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी ज्ञानेश अ. शिंदे, सूरज स. शिंदे यांनी सांभाळली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

‘जिद्दारी’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

 

Web Title : Jiddari Marathi Movie | Jiddari with a passionate love story is coming to the audience on the eve of shivjayanti 2022

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | तासगाव-भिलवडी रोडवर छोटा हत्तीची तिघांना धडक; RTI कार्यकर्ता संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू

Maharashtra Rains | राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Pregnancy Care | गरोदरपणात ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही खाऊ नये, अन्यथा होतील गंभीर परिणाम

 

Related Posts