IMPIMP

Karjat Nagar Panchayat Election | कर्जत नगर पंचायत निवडणुक ! कोण मारणार बाजी? राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये ‘सामना’

by nagesh
 Rohit Pawar Vs Ram Shinde | karjat jamkhed nagar panchayat election result rohit pawar ncp wins setback for bjp leader ram shinde

अहमदनगर :  सरकारसत्ता ऑनलाइन Karjat Nagar Panchayat Election | महाराष्ट्रात काही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat Election) दोन दिग्गज नेते नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आणि भाजप नेते (BJP) आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात चुरस असणार आहे. त्यामुळे यंदा नगरपंचायती निवडणुकीत गड कुणाचा? हे पहावे लागणार.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूका (Karjat Nagar Panchayat Election) होणार आहेत. कर्जत नगरपंचायतीवर सध्या भाजपची (BJP) एक हाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी राम शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. तसेच दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्याकडून भाजपचा गड खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे.

2019 च्या विधानसभेत रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे तेथे भाजपला एक धक्का बसला. त्यानंतर आता येत्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत (BJP and NCP) मोठी लढत असणार आहे. दुसरीकडे ही निवडणुक रोहित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. तर राम शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. या पार्श्वभुमीवर हे दोन्ही नेते आता आपल्या पक्षांची बाजू भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी केलाय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, ‘या काळात मतदारसंघात मी अनेक विकासाची कामे केली.
मात्र, मागील दोन वर्षांपासून कुठलंही काम या मतदारसंघात झालं नाही,
अशी टीका शिंदे यांनी रोहित पवारांवर केली.
तसेच आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या विश्वासावर जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही,
असं राम शिंदे (Ram Shinde) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Karjat Nagar Panchayat Election | karjat nagar panchayat ram shinde and rohit pawar once again face off in karjat nagar panchayat elections

 

हे देखील वाचा :

Pune Crime | राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी

Maharashtra Cabinet Decision | ठाकरे सरकारचे 4 मोठे निर्णय; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, एकावर FIR

 

Related Posts