IMPIMP

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील 12 जणांना जामीन मंजूर

by nagesh
Kirit Somaiya Attack Case | BJP leader kirit somaiya 12 attacker bail granted in shivaji nagar court in pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनKirit Somaiya Attack Case | भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिका (Pune Corporation) परिसरात धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी (Kirit Somaiya Attack Case) पोलिसांनी 12 जणांना अटक (Arrest) करुन पोलीस बंदोबस्तात आज (मंगळवार) शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Court, Pune) हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना प्रथम न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. मात्र बचाव पक्षाच्या वतीने जामिनासाठी अर्ज (Bail Application) दाखल करण्यात आला. सरकारी वकिलांनी (Government Prosecutors) त्या अर्जाला विरोध केला. मात्र प्रकरणातील गुन्हे जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. यानंतर अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस. व्ही. दिंडोकर (Additional Magistrate S.V. Dindokar) यांनी प्रत्येकी साडेसात हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर (Bail Granted) केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय हरिश्चंद्र मोरे (Sanjay Harishchandra More), किरण प्रकाश साळी (Kiran Prakash Sali), सुरज मथुराम लोखंडे (Suraj Mathuram Lokhande), आकाश चंद्रकांत शिंदे (Akash Chandrakant Shinde), रुपेश आनंदराव पवार (Rupesh Anandrao Pawar), राजेंद्र दामोदर शिंदे (Rajendra Damodar Shinde), निलेश दशरथ गिरमे (Nilesh Dashrath Girme), मुकुंद पांडुरंग चव्हाण (Mukund Pandurang Chavan), अक्षय शरद फुलसुंदर (Akshay Sharad Fulsunder), निलेश हनुमंत जगताप (Nilesh Hanumant Jagtap) आणि सनी वसंत गवते (Sunny Vasant Gwate) अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. (Kirit Somaiya Attack Case)

 

जामीन मिळालेल्या आरोपींसह 60 ते 70 महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लाटे Prashant Late (वय-30 रा. वडारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी (दि.5) सायंकाळी पाचच्या सुमारास किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली होती.

 

सरकारी पक्षाच्या वतीने सर्वांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मागणी करण्यात आली.
न्यायालयाने प्रथम न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी वकील सतीश मुळीक (Adv. Satish Mulik), सचिन हिंगणेकर (Adv. Sachin Hinganekar) यांनी अर्ज केला.
याला सरकारी वकिलांनी विरोध केला.
या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असून त्यांना अटक करणे, मुख्य सुत्रधाराबाबत तपास करणे, हा गुन्हा राजकीय स्वरुपाचा असून त्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली.
न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपींना जामीन मंजूर केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Kirit Somaiya Attack Case | BJP leader kirit somaiya 12 attacker bail granted in shivaji nagar court in pune

 

हे देखील वाचा :

Digital News Publishers-Accreditation | डिजिटल वृत्त संस्थामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना मिळणार अधिस्वीकृती

Maharashtra Police | दिंडीतील वारकऱ्याचा खून प्रकरणात पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले याला जन्मठेप; सहाय्यक पोलिस आयुक्तांसह यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

Sangli Crime | गुप्तधन शोधले नाही म्हणून केला तरुणाचा खून; प्रचंड खळबळ

 

Related Posts