IMPIMP

Maharashtra Police | दिंडीतील वारकऱ्याचा खून प्रकरणात पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले याला जन्मठेप; सहाय्यक पोलिस आयुक्तांसह यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police | पंढरपूरला (Pandharpur) आलेल्या दिंडीतील वारकऱ्याला (Warkari in Dindi) जेवणासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने खून केल्याची घटना 5 जुलै 2017 रोजी घडली होती. नितीन अर्जुन यादव Nitin Arjun Yadav (रा. वायफळ, ता. जत. जि. सांगली) असे खून (Murder) झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिस नाईक दत्तात्रय भोसले Police Dattatraya Bhosale (नेमणुक मंगळवेढा पोलिस स्टेशन (Mangalwedha Police Station) , जि. सोलापूर) याला दोषी ठरवून नगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime) श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. जी. शुक्ल (Shrigonda District and Sessions Court Judge N.G. Shukl) यांनी जन्मठेप (Life-Imprisonment) व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (Maharashtra Police)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, मयत नितीन यादव हे 2 जुलै 2017 रोजी दिंडीमध्ये पंढरपूर येथे गेले होते. पंढरपूला गेल्यावर आरोपी दत्तात्रय भोसले हा यादव यांना अनेकवेळा मठामध्ये आणि हॉटेलमध्ये भेटला होता. 5 जुलै 2017 रोजी नितीन यादव हे दिंडीतून परत निघाले, त्यावेळी आरोपी भोसले याने नितीन यांना बाहेर जेवायला जावू, असे म्हणाला. ही बाब नितीन यांनी अंबादास माने (Ambadas Mane) व समाधान नाडगे (Samadhan Nadge) यांना सांगितली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास नितीन हे घेरडी येथे उतरले. त्यानंतर आरोपीने नितीन यांना गाडीत बसवून त्याचा गळा दाबून खून केला व मृतदेह बाभुळगाव खालसा ता. कर्जत येथे टाकला. दरम्यान, नितीन हे घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नसल्याने नातेवाईकांनी सांगोला पोलीस ठाण्यात (Sangola Police Station) नितीन यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. (Maharashtra Police)

 

त्यानंतर 6 जुलै 2017 रोजी बाभुळगाव खालसा (Babhulgaon Khalsa) येथील पोलीस पाटील यांना एका पुरुषाचा मृतदेह रोडलगत असलेल्या खड्ड्यात आढळून आला.
त्यांनी याची माहिती पोलीस स्टेशनला दिली.
त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध 302, 201 प्रमाणे कर्जत पोलीस स्टेशनला (Karjat Police Station) तक्रार दिली.
7 जुलै 2017 रोजी प्रदिप यादव (Pradip Yadav) याने आरोपी दत्तात्रय भोसले याला नितीन बाबत विचारले असता, त्याने कर्जत पोलीस स्टेशन येथे नितीन याचा मृतदेह आढळून आला आहे व तसे फोटो त्याने प्रदिप यांच्या मोबाईलवर पाठवले.
फोटो पाहिल्यानंतर तो नितीनच असल्याची त्यांची खात्री पटली.
त्याच दिवशी प्रदिप यांनी नितीन यांच्या मोबाईलवर Hi असा मेसेज पाठवला.
त्यानंतर नितीन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
तसेच प्रदिप यांनी नितीन यांचा गळा दाबून खून केल्याचा जबाब पोलिसांना दिला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, 20 ऑगस्ट 2017 रोजी मेसेज रिसीट झाल्याचे दिसले.
म्हणून त्यांनी दत्तात्रय भोसले याच्यावर संशय व्यक्त केला.
हा खून पोलिस नाईक भोसले याने केल्याची बाब मोबाइलच्या तांत्रिक तपासानुसार स्पष्ट झाली.
त्यामुळे भोसले व त्याच्या एका साथीदार राजेंद्र शिवाजी पाटील (Rajendra Shivaji Patil) याला अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक वसंत भोये (Police Inspector Vasant Bhoye) यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले.
या खटल्याची चौकशी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी शुक्ल यांच्यासमोर झाली.

 

या खटल्यात प्रदिप यादव (मयताचा भाऊ), अंबादास माने, पोलीस नाईक दत्तात्रय कासार (Police Dattatraya Kasar), पुण्यातील डॉ. झंजाड, सचिन माने, पोलीस पाटील संदीप पाटील, रमेश घोडके, समाधान नाडगे, पोलीस निरीक्षक अभिषेक डाके (Police Inspector Abhishek Dake),
पोलीस कॉन्स्टेबल विकास क्षीरसागर, इरफान मुलाणी, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
पोलीस निरीक्षक ज्योतीराम गंजावटे (Police Inspector Jyotiram Ganjavate),
नरेंद्र खरवे, प्रवीण कानवडे, पोलीस निरीक्षक वसंत भोये यांच्या महत्त्वाच्या साक्षी झाल्या.
ACP सुनील पवार, मृताचा भाऊ प्रदीप, काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या

 

सर्वांची साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दत्तात्रय भोसले याला दोषी ठरवून भा. दं. वि. कलम 302 प्रमाणे जन्मठेप व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
आरोपी राजेंद्र पाटील याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल घोडके (Additional Government Prosecutor Anil Ghodke) यांनी काम पाहिले.
तसेच त्यांना महिला पोलीस कॉन्स्टेबल ए. डी. खामकर यांनी मदत केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Police | Dattatraya Bhosale sentenced to life imprisonment in murder case Witnesses including the Assistant Commissioner of Police Sunil Pawar became important

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | गुप्तधन शोधले नाही म्हणून केला तरुणाचा खून; प्रचंड खळबळ

Munmun Dutta | तारक मेहतामधील ‘बबीता’ची 4 तासांच्या चौकशीनंतर जामीनावर सुटका? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

Multibagger Stocks | ‘या’ 5 शेयरने एक महिन्यात भरली गुंतवणुकदारांची झोळी, तुमच्याकडे सुद्धा असावेत ‘हे’ स्टॉक्स; जाणून घ्या

 

Related Posts